कोणत्याही गोष्टीचा शेवट हा युद्धाने होतो. बांगलादेशातील हिंदूंसाठी नुसते रस्त्यावर उतरून निषेध फेऱ्या काढून काही होणार नाही, त्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकला पाहिजे. यासाठी लोकांमध्ये ठिणगी पेटवली पाहिजे. आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे, बांगलादेशी (Bangladesh) मुसलमानांकडून काही खरेदी करायचे नाही, त्यांना कामाला ठेवायचे नाही. बांगलादेशात अदानी यांनी वीज देणे बंद केले आहे, आपल्याकडील पाणी बांगलादेशात जाते ते बंद केले पाहिजे, त्यांचा वस्त्रोद्योग आपल्यावर अवलंबून आहे तोही बंद करायला हवा, आर्थिक नाड्या त्यांचा आवळणे हा युद्धाच्या पूर्वीचा उपाय आहे, अशी रोखठोक भूमिका वीरमाता वीरमाता अनुराधा गोरे यांनी मांडली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच यांच्या सहयोगाने ‘बांगलादेश (Bangladesh) सद्य परिस्थिती आणि भविष्य’ या विषयावर स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून वीरमाता अनुराधा गोरे बोलत होत्या. यावेळी खारघर येथील इस्कॉनचे प्रमुख आचार्य सूरदासजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण द्या; खासदार Naresh Mhaske यांची केंद्र सरकारकडे मागणी)
गांधी-नेहरूंनी हिंदूंना शस्त्रहीन बनवले
१९७१ मध्ये आपण ऐतिहासिक विजय मिळवला आणि दुसरा देश जन्माला घातला. आज केवळ त्या बांगलादेशातच (Bangladesh) हिंदूंवर अन्याय होत आहे, तर काल – परवा संभल येथून हिंदूंचे पलायन करावे लागले. शस्त्र हा शेवटचा पर्याय असला तरी त्यानेच शांतीची प्राप्त होते. तेव्हाही अमेरिकेचा १९७१ च्या युद्धात भारताला विरोध होता, तरी आपण युद्ध जिंकले. तेव्हाच्या तुलनेत आज आपण अधिक सक्षम झालो आहोत, ते युद्ध १३ दिवसांत पूर्ण केले, आता ते ३ दिवसांत पूर्ण करू शकतो. बांगलादेशातील हिंदू म्हणत आहेत, आम्ही पूर्वी पळून गेलो, आता आम्ही पळून जाणार नाही, आम्हाला स्वतःचा हिंदूंचा बांगलादेश (Bangladesh) हवा आहे. मात्र तेथील मुसलमानांनाही त्यांचा स्वतःचा देश हवा आहे, पण तो ग्रेटर बंगाल हवा आहे, ज्यात पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील काही भागाचा समावेश असेल, ज्याला ते मुघलिस्तान म्हणत आहेत. बंगाल हा आधी हिंदूंचा देश होता, त्यावर वेगवेगळ्या राज घराण्यांचे राज्य होते. पण त्यातील काही घराण्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदूंचे शौर्य लयास गेले आणि खिलजीने त्यावर कब्जा घेतला. त्यानंतर फाळणीच्या वेळी नौखालीत हिंदूंवर अत्याचार झाले, त्यावर हिंदूंनी शस्त्रे हाती घेतली, तेव्हा गांधींनी हिंदूंना शस्त्रे खाली ठेवायला सांगितली, जेव्हा जेव्हा हिंदूंनी शस्त्रे हाती घेतली, तेव्हा तेव्हा गांधी – नेहरूंनी हिंदूंना निष्क्रिय बनवले, असेही वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या.
हिंदूंनी कधीच शस्त्रे खाली ठेवली नव्हती
आज चीनमध्ये मुसलमानांची नांगी ठेचण्यात आली आहे, फ्रान्स, जर्मन हे देशही याच दिशेने पावले उचलत आहेत. ब्रह्मदेशात शस्त्रशक्तीसह धर्मशक्ती एकत्र आली आणि तेथील परिस्थिती पालटली, तशी भारतात धर्मशक्ती, शस्त्रशक्ती, राजशक्ती आणि लोकशक्ती एकत्र आली, तरच आपली लढाई सोपी जाणार आहे. हिंदूंमधील वीर रस निर्माण करण्यासाठी आता चुकीचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे तो आधी बदलला पाहिजे आणि हिंदूंचा पराक्रमी इतिहास शिकवला गेला पाहिजे. अनेक राजे ज्यांची नावे आपण ऐकली नाहीत त्यांचा परिचय हिंदूंना करून दिला पाहिजे. हिंदूंनी शस्त्र कधीच खाली ठेवली नव्हती, पण स्वतंत्र भारतात हिंदूंवर कायम बिंबवले गेले की, भारत हा बावळट, मूर्ख आणि कायम हरणारा देश आहे. ही जी प्रतिमा तयार झाली त्याचा पगडा इतका बसला कि युद्ध म्हटले कि आम्ही घाबरतो, महागाई वाढेल, अशी भीती वाटते. १९७१ मध्ये आपण लढलो काय झाले पुन्हा वर आलोच ना, महाभारत मोठे युद्ध झाले परत आलो वर, आता तर अनेक शस्त्रास्त्रांनी आपण संपन्न आहोत, तेव्हा लढण्याची वृत्ती हिंदूंनी वाढवली पाहिजे, असेही वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या.