Mumbai Crime : चायनीज मंचुरियन’ ग्राईंडर मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

87
Mumbai Crime : चायनीज मंचुरियन' ग्राईंडर मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Crime : चायनीज मंचुरियन' ग्राईंडर मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

‘चायनीज मंचुरियन’साठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मध्ये अडकून एका कामगाराचा दुर्देवी अंत झाल्याची घटना दादर येथे समोर आली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ग्राइंडरमध्ये अडकलेल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला असून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)

सूरज यादव (Suraj Yadav) असे मृत कामगाराचे नाव आहे. सूरज यादव (Suraj Yadav) हा मागील वर्षभरापासून नरीमन भाटनगर येथील अमर संदेश मंडळ या ठिकाणी सचिन कोठेकर (Sachin Kothekar) यांच्याकडे चायनीज खाद्य पदार्थांसाठी लागणारा कच्चा माल बनवण्याचे काम करीत होता. त्याच्यासोबत आणखी पाच कामगार तेथे काम करतात. चायनीज मंचुरियन बनवण्यासाठी पीठ मळणे, कोबी, फ्लॉवर बारीक करणे यासाठी कोठेकर यांनी एका खोलीमध्ये इलेक्ट्रीक ग्राईंडरची व्यवस्था केली होती. यादव हा मागील वर्षभरापासून या ग्राईंडरवर काम करीत होता. (Mumbai Crime)

(हेही वाचा – ST ला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न)

शनिवारी मंचुरियन साठी कच्चा माल आणण्यासाठी मालक कोठेकर याने सूरज यादवला (Suraj Yadav) पाठवले. बऱ्याच वेळानंतर चायनीज मंचुरियन’च्या गाडीवर असलेल्या सचिनला कोठेकर (Sachin Kothekar) याला सूरज ग्राईंडरमध्ये अडकल्याचे फोन करून सांगण्यात आले. मालक कोठेकर हा घटनास्थळी आला असता सूरज हा पूर्णपणे ग्राईंडरमध्ये अडकला होता. कोठेकर आणि इतर कामगारानी त्यांनी त्याला ग्राईंडरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर काढता येत नव्हते. या घटनेची माहिती दादर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने सूरजला ग्राईंडरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून परळ येथील केईएम रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. (Mumbai Crime)

सूरजला ग्राईँडर चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्याला ग्राईंडरमधून कच्चा माल काढण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्याच्या चुलत भावाने केला असून दादर पोलिसांनी त्याच्या भावाची फिर्याद घेऊन मालक सचिन कोठेकर (Sachin Kothekar) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.