Kurla Best Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातातील जखमी फझलू शेखचा मृत्यू, मृतांची संख्या ८ वर

85
Kurla Best Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातातील जखमी फझलू शेखचा मृत्यू, मृतांची संख्या ८ वर
Kurla Best Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातातील जखमी फझलू शेखचा मृत्यू, मृतांची संख्या ८ वर

कुर्ला पश्चिम येथे मागील आठवड्यात झालेल्या बेस्ट बस अपघातात जखमी झालेल्यापैकी फझलू रहेमान शेख यांचा सोमवारी पहाटे सायन रुगणालयात उपाचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. फझलू शेख (Fazlu Sheikh) यांच्या निधनानंतर या अपघातात मृत झालेल्यांची संख्या ८ झाली आहे. या अपघातात जखमींची संख्या ४२ होती, त्यातील अनेक जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – Counterfeit Medicine: धक्कादायक! ठाण्यात बनावट औषधाचा साठा जप्त)

कुर्ला पश्चिम स.गो.बर्वे मार्गावर ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४२ जण जखमी झाले होते. जखमींवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालय तसेच कुर्ल्यातील काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सायन रुग्णालयात उपचार घेणारे फझलू रहेमान शेख (५८) यांचा सोमवारी पहाटे निधन झाले, फझलू रहेमान शेख (Fazlu Sheikh) हे घाटकोपर पश्चिम येथे कुटूंबासह राहण्यास होते, भाजीचा व्यवसाय करणारे फझलू यांची मोठी मुलगी नगमा हिचे सासर कुर्ला पश्चिम एलआयजी कॉलनी येथे आहे. मुलगी गर्भवती असल्यामुळे वडील फझलू हे मुलीला भेटण्यासाठी पत्नी अस्मातूनिसा (५५) सोबत ९ डिसेंबर रोजी कुर्ला पश्चिम येथे आले होते. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – Crime : पतीला तुरुंगातून सोडवण्यासाठी तीने चक्क सव्वा महिन्याच्या मुलीची केली विक्री)

रात्री जेवण करून ते पुन्हा घाटकोपर (Ghatkopar) येथे घरी जाण्यासाठी निघाले होते, त्या वेळी त्याची मुलगी नगमा आणि नात मस्कत (५) ही कुर्ला भाजी मंडई येथे सोबत आले होते, भाजी मंडई येथून फळे घेऊन आई वडिलांना रिक्षात बसवुन नगमा जाणार होती, फजलु रिक्षासाठी शीतल बेकरी जवळ उभे असताना भरधाव वेगात वाहने आणि लोकांना चिरडत आलेल्या बेस्ट बसने फजलु यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी आणि नातीला धडक दिली होती. या अपघातात फझलू त्यांची पत्नी, मुलगी नगमा आणि नात गंभीर जखमी झाले होते. जखमींना त्यांना इतर जखमीसह भाभा रुगणालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर फझलू शेख (Fazlu Sheikh) यांना सायन रुग्णालय आणि पत्नी, मुलगी आणि नात यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फझलू शेख यांच्यावर सायन रुगणालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे फझलू यांची पत्नी, मुलगी आणि नात यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Kurla Best Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.