Elon Musk Net Worth : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे नेमका किती पैसा आहे?

एलॉन मस्क ४०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठणारे पहिले उद्योजक आहेत.

45
Elon Musk Net Worth : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे नेमका किती पैसा आहे?
Elon Musk Net Worth : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे नेमका किती पैसा आहे?
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले आणि अमेरिकेत वाढलेले एलॉन मस्क एक अभियंता, गुंतवणूकदार आणि अभिनव कल्पना राबवणारा यशस्वी उद्योजक आहे. टेस्ला या स्वयंचलित गाड्यांचा निर्माता आणि संस्थापक अध्यक्ष, स्पेसएक्सचा सहसंस्थापक, न्यूरालिंकचा अध्यक्ष, सोलार सिटी, झिप२ आणि द बोअरिंग कंपनी यांचाही सहसंस्थापक आहे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण, या सगळ्या कंपन्या नवीन संकल्पना राबवणाऱ्या आणि जगाच्या पुढे असलेल्या आहेत. पण, त्या जोरावर एलॉन मस्कने अब्जावधी डॉलरची मालमत्ता उभी केली आहे. (Elon Musk Net Worth)

ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, मस्क यांची एकूण मालमत्ता ४४७ अब्ज अमेरिकन डॉलर (American Dollar) इतकी आहे. ४०० अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठलेले ते पहिले व्यक्ती आहेत. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर मस्क यांची मालमत्ता आहे ३४,००० अब्ज रुपये. अलीकडेच मस्कने स्पेसएक्स कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. या व्यवहारातून त्यांना ५० अब्ज अमेरिकन डॉलर मिळाले. तर डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांचे समर्थक असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याची परिणती मस्क यांची संपत्ती वाढण्यात झाली आहे. लवकरच ते ४५० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठतील असा अंदाज आहे.

(हेही वाचा – ‘One Nation, One Election’ विधेयक मंगळवारी सादर होण्याची शक्यता; भाजपाने जारी केला व्हिप )

टेस्ला आणि स्पेसएक्स या एलॉन मस्क यांच्या मुख्य दोन कंपन्या आहेत. आणि त्यातूनच त्याचं उत्पन्न येतं. टेस्ला ही इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित कार उत्पादक कंपनी असून स्पेसएक्स ही खाजगी उपग्रह सेवा सुरू करणारी पहिली कंपनी आहे. मंगळावर मानवी वसाहत शक्य करून दाखवण्याचं उद्दिष्टं या कंपनीने ठेवलं आहे.

WhatsApp Image 2024 12 17 at 9.08.23 AM 1

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी १९९५ मध्ये आपला भाऊ किंबलच्या साथीने झिप२ कंपनी स्थापन केली होती. वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटला ऑनलाईन मजकूर छापण्यासाठी सागणारं सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम ही कंपनी करत होती. आणि १९९९ मध्ये कॉम्पॅकने ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर मस्क यांनी पेपाल ही ऑनलाईन पेमेंट कंपनी स्थापन केली. ईबेनं ती १.५ अब्ज अमेरिकन डॉलरला विकत घेतली. तिथून पुढे २००२ मध्ये मस्क यांनी टेस्ला कारवर काम सुरू केलं. मस्क यांच्या नेतृत्वाखाली टेस्ला ही जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी बनली. आणि तिथून मस्क यांची दखल जगाने घेतली. पुढे स्पेसएक्स, सोलारसिटी, न्यूरोलिंक अशा कंपन्यांची मालिकाच मस्क यांनी सुरू केली आहे. पुढे या कंपन्या टेस्लाने अधिग्रहित केल्या. आणि यातून मस्क यांचं सध्याचं साम्राज्य उभं राहिलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.