Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाची कामे, पगार व जबाबदाऱ्या काय असतात?

आयकर निरीक्षकाच्या हातात सरासरी ५८,९७६ ते ६९,३९६ रुपये इतका पगार येतो.

52
Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाची कामे, पगार व जबाबदाऱ्या काय असतात?
Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाची कामे, पगार व जबाबदाऱ्या काय असतात?
  • ऋजुता लुकतुके

देशातील विविध सरकारी पदभरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून स्पर्धा परीक्षा घेतली जाते. शिपाई पासून ते ग्रेड अधिकारी पदावरील भरतीही या आयोगाकडूनच होते. अर्थ मंत्रालयाच्या प्रत्यक्ष कर संचालनालयातील बी वर्गातील प्रतिष्ठित पद आहे ते आयकर निरीक्षकाचं. कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या परिक्षेसाठी पात्र आहेत. हा विभाग कर वसुली आणि करमोजणी तसंच अहवाल तयार करण्याचं काम करतो.

आयकर निरीक्षकाचा मासिक पगार (Income Tax Inspector Salary) त्यावर मिळणारे भत्ते यामुळे हा आयकर विभागातील नोकरी ही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. पण, त्याचवेळी या पदावरील व्यक्तीच्या जबाबदाऱ्याही मोठ्या आहेत. आयकर निरीक्षकाचा मूळ पगार वार्षिक सरासरी ५,३८,८०० रुपये ते १७,०८,८०० रुपये इतका असतो. अनुभव, सेवा ज्येष्ठता आणि तुमची नियुक्ती झालेलं शहर यावर हा पगार अवलंबून असतो.

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातातील जखमी फझलू शेखचा मृत्यू, मृतांची संख्या ८ वर)

यात श्रेणीचा भत्ता म्हणून दरवर्षी पगारात ४,६०० रुपये इतकी पगारवाढ होते. याशिवाय इतर भत्तेही या पगारात जमा होत असतात. हे भत्ते समजून घेऊया.

WhatsApp Image 2024 12 17 at 9.22.36 AM

आयकर निरीक्षकाला मिळणारा हा सरासरी पगार आहे. आणि त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. आयकर वसुलीची सर्व व्यवस्था, प्रक्रिया, नोंदणी हे सगळं व्यवस्थित आहे ना यावर लक्ष ठेवणं हे निरीक्षकाचं महत्त्वाचं काम आहे. कर वसुलीचं ऑडिट आणि कर वसुलीची कामं कायदेशीर होतात की नाही याची काळजीही निरीक्षक घेत असतो. ही कामं सुरळीत व्हावीत यासाठी कार्यालयातील वातावरण चांगलं ठेवणं हे निरीक्षकाचंच काम आहे. कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करणंही निरीक्षकाचं काम आहे. त्यादृष्टीने निरीक्षकाकडे काही कौशल्य असावी लागतात. तांत्रिक कौशल्याच्या बरोबरीने विश्लेषणात्मक कौशल्यही आयकर निरीक्षकाकडे असावं लागतं. (Income Tax Inspector Salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.