- ऋजुता लुकतुके
मुंबई शहराला आधुनिक बनवण्यात तिथल्या मॉलचा मोठा वाटा आहे. महालक्ष्मी मंदिरासमोरच्या चौकात असलेलं हिरा-पन्ना औद्योगिक केंद्र हे तेव्हाचं खूप मोठं आणि देशातील पहिलं अशा प्रकारचं औद्योगिक केंद्र होतं. मॉल सारखी मोठ्या ब्रँडची दुकानं पहिल्यांदा तिथेच उभी राहिली. पण, त्यानंतर अशा केंद्रांना मॉलचं स्वरुप आलं. आणि आता मुंबईत तब्बल २,२६६ छोटे – मोठे मॉल उभे राहिले आहेत. यातील सगळ्यात मोठा मॉल आहे मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकाच्या जवळ असलेला फिनिक्स मार्केट सिटी मॉल. (Phoenix Mall Kurla)
२.१ दशलक्ष वर्गफूट इतक्या विस्तीर्ण जागेवर वसलेल्या या मॉलमध्ये ६०० च्या वर देशी आणि विदेशी ब्रँडच्या फ्रँचाईजी आहेत. ७० विविध प्रकारची हॉटेल आहेत. सिनेमाच्या १५ स्क्रीन आणि स्नोपार्कसह विविध प्रकारचे खेळही आहेत. (Phoenix Mall Kurla)
(हेही वाचा – MP News : भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांची आता काही खैर नाही; थेट FIR दाखल होणार)
मुंबईतील पहिल्या १० क्रमांकाचे मॉल पाहूया,
कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेला फिनिक्स मार्केटसिटी हा मॉल (Phoenix Mall Kurla) मुंबईतील सध्याचा सगळ्यात मोठा आणि २.१ दशलक्ष वर्गफूटांवर वसलेला मॉल आहे. फिनिक्स कंपनीचा मुंबईतील हा तिसरा मॉल आहे. २०११ साली या मॉलची सुरुवात झाली होती. द फिनिक्स मिल्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीकडे या मॉलची मालकी आहे. या मॉलमध्ये ६०० च्या वर भारतीय आणि विदेशी ब्रँडची दुकानं आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community