-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्ये दुहेरी हॅट – ट्रिकची उदाहरणं तशी विरळच आहेत. दुहेरी हॅट ट्रीक म्हणजे सलग चार चेंडूंवर बळी मिळवणे. पण, अर्जेंटिनाच्या हर्नान फेनेलने (Hernan Fennell) आयसीसीच्या (ICC) अमेरिका खंडातील एका पात्रता स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. केमन आयलंड्स विरुद्धच्या सामन्यात त्याने सलग चार चेंडूंवर बळी मिळवले. या कामगिरीसह हा ३६ वर्षीय तेज गोलंदाज जगातील मोजक्या क्रिकेटपटूंच्या यादीत जाऊन बसला आहे. दुहेरी हॅट ट्रिकमुळे त्याने सामन्यांत १५ धावांत ५ बळीही मिळवले. (Double Hat – Trick in T20)
टी-२० क्रिकेटमध्ये फेनेलच्या (Hernan Fennell) आधी पाच गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर, आयर्लंडचा कर्टिस कँफर आणि लेसोथोचा वसिम याकूबर या गोलंदाजांच्या पंक्तीत आता फेनेल (Hernan Fennell) जाऊन बसला आहे. याशिवाय कारकीर्दीत एकापेक्षा जास्त हॅट ट्रिकचा मानही पठ्ठ्याने मिळवला आहे.
(हेही वाचा – D Gukesh : चेन्नईत परतल्यावर डी गुकेशने लुटली बंजी जंपिंगची मजा, व्हीडिओ व्हायरल)
आणि त्याबाबतीतही तो जगातील फक्त ६ गोलंदाजांपैकी एक आहे. २०२१ च्या आयसीसी अमेरिकन पात्रता स्पर्धेत पनामा देशाविरुद्घ त्याने यापूर्वी एकदा हॅट ट्रिक केली होती. आता ही त्याची दुसरी वेळ आहे. (Double Hat – Trick in T20)
A double hat-trick and a five-wicket haul!
A day to remember for Hernan Fennell in Americas #T20WorldCup qualifying 🇦🇷
More 👉 https://t.co/zIjpcvA2AB pic.twitter.com/Lja2JQDOcF
— ICC (@ICC) December 16, 2024
फेनेलच्या बरोबरीने ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, सर्बियाचा मार्क पावलोविक, न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि श्रीलंकेच्या मलिंगाने दोनदा हॅट ट्रिक साध्य केली आहे. पण, फेनेलची ही कामगिरीही अर्जेंटिनाला विजय मिळवून देऊ शकली नाही. केमन आयलंड्सच्या ११६ धावसंख्येचा पाठलाग करताना अर्जेंटिनाचा संघ ९४ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे अर्जेंटिनाने हा सामना २२ धावांनी गमावला. (Double Hat – Trick in T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community