Ind vs Aus, Brisbane Test : रोहित, गंभीर यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?

या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वावर टीका होत आहे.

46
Ind vs Aus, Brisbane Test : रोहित, गंभीर यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?
Ind vs Aus, Brisbane Test : रोहित, गंभीर यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिकेत (Border – Gavaskar series) पहिली पर्थ कसोटी भारतीय संघाने २९५ धावांनी जिंकली. पण, त्यानंतर भारतासाठी काहीही मनासारखं धडलेलं नाही. ॲडलेड आणि पाठोपाठ ब्रिस्बेनमध्येही भारतीय फलंदाजी ढेपाळली. अशावेळी कर्णधार म्हणून आणि फलंदाजीतील अपयशामुळेही रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. ब्रिस्बन कसोटीत (Brisbane Test) नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी घेण्याच्या रोहितच्या निर्णयावरही जाणकारांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. अशावेळी रोहितने घेतलेले काही निर्णयही वादात सापडले आहेत. पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात समन्वय आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

‘गंभीर (Gautam Gambhir) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. ही गोष्ट श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतही दिसली. पण, त्या मायदेशातील मालिका तुलनेनं सोप्या होत्या. तेव्हा ही गोष्ट खपून गेली. पण, आता ही गोष्ट अधोरेखित होत आहे. नेमके निर्णय कोण घेतंय. आणि खेळाडूंची निवड कशी होतेय, यावर दोघांमध्ये एकवाक्यता दिसत नाहीए, असं बासित अलीने आपल्या युट्यूब वाहिनीवर बोलून दाखवलं.’

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : जोश हेझलवूडच्या दुखापतीचा भारताला दिलासा)

खेळाडू निवडीवर त्याने उदाहरण दिलं ते फिरकीपटूच्या संघातील समावेशाचं. सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने तीन कसोटींमध्ये तीन वेगवेगळे फिरकीपटू निवडले आहेत याकडे त्याने बोट दाखवलं. ‘मायदेशात न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत वॉशिंग्टन सुंदरला मध्यातून संघात घेतलं गेलं. तो यशस्वी झाला हा भाग वेगळा. आता तर तीन सामन्यांमध्ये तीन वेगळे फिरकीपटू भारताने खेळवले. यामुळे खेळाडूंवर प्रशासनाचा विश्वास आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. जाडेजा सारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणं ही चूक होती,’ असं बासित अली पुढे म्हणतो. (Ind vs Aus, Brisbane Test)

भारतीय संघाची ढासळलेली कामगिरी ही बहुतांशी संघ प्रशासनाच्या चुकांचं फलित आहे, असं बासित अलीचं म्हणणं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.