काँग्रेसने वारंवार राज्यांतील सरकारे पाडली; नड्डांनी सांगितली One Nation One Election ची गरज

683
‘एक देश, एक निवडणूक’ वरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पण, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या सर्व गदारोळात भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. (One Nation One Election)
भाजपाचे जेष्ठ नेते जे. पी नड्डा (JP Nadda) यांनी राज्यसभेत कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. नड्डा म्हणाले की, मागील काँग्रेस सरकारनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केला असून, मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असून. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान नड्डांनी काँग्रेसवर राज्यघटनेची मूलभूत तत्वे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
नड्डा पुढे म्हणाले की, आज तुम्ही एक देश, एक निवडणुकीच्या विरोधात उभे आहात. पण, तुमच्यामुळेच एक देश, एक निवडणूक आणायची आहे. कारण 1952 ते 1967, या काळात देशात एकाच वेळी निवडणुका झाल्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारे पाडलीत आणि अनेक राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली.
इंदिराजींनी 50 वेळा तर मनमोहन यांनी 10 वेळा वापरला
कलम 356 (Section 356) चे आकडे सभागृहात मांडताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेस सरकारने 90 वेळा कलम 356 चा गैरवापर केला आहे. इंदिरा गांधींनी कलम 356 चा सर्वाधिक 50 वेळा वापर केला. तर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा आठ वेळा, राजीव गांधींनी नऊ वेळा आणि मनमोहन सिंग यांनी दहा वेळा गैरवापर केला आहे, अशी घणाघाती टीकाही नड्डांनी यावेळी केली.

(हेही वाचा – काँग्रेसने वारंवार राज्यांतील सरकारे पाडली; नड्डांनी सांगितली One Nation One Election ची गरज)

मनमोहन, गुजराल, अडवाणी यांचा उल्लेख केला
पश्चिम पाकिस्तानातून आलेले मनमोहन सिंग, इंदर कुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले, पश्चिम पाकिस्तानातून आलेले लालकृष्ण अडवाणी भारताचे उपपंतप्रधान झाले. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पीओकेतून जम्मू-काश्मीरमध्ये आलेला एकही व्यक्ती जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा सदस्य होऊ शकत नव्हता, त्यांना पंचायत निवडणूक लढवता येत नव्हता, त्या व्यक्तीला मतदानही करण्याचा अधिकार नव्हता. नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सरकारने त्यात सुधारणा केली आणि आज जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.