Tim Southee Retires : टीम साऊदीला निरोप न्यूझीलंडच्या मोठ्या विजयाने

Tim Southee Retires : साऊदीच्या शेवटच्या कसोटीत किवी संघाने इंग्लंडचा ४२३ धावांनी पराभव केला.

55
Tim Southee Retires : टीम साऊदीला निरोप न्यूझीलंडच्या मोठ्या विजयाने
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंडचा अनुभवी टीम साऊदी आपली शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी हॅमिल्टनमध्ये खेळला आणि संघाने त्याला निरोप दिला तो विजयाने. ही कसोटी किवी संघाने ४२३ धावांनी जिंकली. मालिका जरी इंग्लंडने २-१ ने जिंकली असली तरी न्यूझीलंडने शेवटची कसोटी जिंकून दिलासादायक विजय मिळवला. कसोटी संपताना जमलेले प्रेक्षक आणि किवी सहकारी यांनी टीम साऊदीभोवती कडं करून त्याला शुभेच्छा दिल्या. (Tim Southee Retires)

३६ वर्षांचा साऊदी न्यूझीलंडकडून १०७ कसोटी खेळला आहे आणि यात त्याने ३७१ बळी मिळवले आहेत. न्यूझीलंडचा सर्वोत्तम तेज गोलंदाज रिचर्ड हॅडली याच्या खालोखाल साऊदी न्यूझीलंडचा दुसरा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. शिवाय १६ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्दही त्याला लाभली. विशेष म्हणजे कसोटीनंतर साऊदीला अधिकृत निरोप देण्यात आला तेव्हा हॅडली तिथे हजर होता. (Tim Southee Retires)

‘टीम हा एक चॅम्पियन खेळाडू आहे. क्रिकेटपटू आणि माणूस म्हणूनही तो चॅम्पियन आहे. त्याचा आऊटस्विंगर जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाजांशी स्पर्धा करणारा होता,’ असं हॅडली यावेळी बोलताना म्हणाला. साऊदीला निवृत्त होताना ४०० बळींचा टप्पा गाठता आला असता तर अधिक चांगलं झालं असतं अशी भावनाही हॅडलीने बोलून दाखवली. (Tim Southee Retires)

(हेही वाचा – रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा; भाजपाचे आमदार Niranjan Davkhare यांची मागणी)

टीम साऊदीने १०७ कसोटी सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ३९१ बळी मिळवले आहेत. तर ६४ धावांत ७ बळी ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. शिवाय कसोटींत १० बळी टिपण्याची कामगिरी त्याने एकदा केली आहे. न्यूझीलंडसाठी १६१ एकदिवसीय सामने खेळताना त्याने २२१ बळी मिळवले आहेत. इथे त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे ती ३३ धावांत ७ बळींची. टी-२० क्रिकेटमध्येही त्याने १६४ बळी मिळवले आहेत. (Tim Southee Retires)

१६ वर्षं न्यूझीलंडकडून खेळताना साऊदीने आयसीसी कसोटी अजिंक्यपद संघाला मिळवून देताना मोलाची भूमिका बजावली होती. तो खेळत असताना कसोटीत किवी संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोहोचला होता. (Tim Southee Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.