मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्याची Ravindra Waikar यांची संसदेत मागणी

45
मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्याची Ravindra Waikar यांची संसदेत मागणी
  • प्रतिनिधी

कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरण करण्यात यावे. तसेच कोळी बांधवाना अनुदान देण्यात यावे. शिवाय मुंबई पोलिस दलाला आधुनिक शस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी पुरवणी माणग्यांवर बोलतांना केली.

(हेही वाचा – UPI Credit Card : युपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय?)

संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. २०२४-२०२५ च्या पुरवणी मागण्यांवर लोकसभेत सोमवारी चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या पुरवणी मागण्यांवर आपले विचार मांडताना खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुंबई, महाराष्ट्र तसेच लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे काही विषय मांडून निधीची मागणी केली.

(हेही वाचा – काँग्रेसने वारंवार राज्यांतील सरकारे पाडली; नड्डांनी सांगितली One Nation One Election ची गरज)

यात मुंबई एयरपोर्टवर नवीन रनवे तसेच एयरपोर्टचा विस्तार करणे, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात दूरसंचार नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्यात यावे, मुंबईत विशेष न्यायालय उभारणे, मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्र देण्यासाठी राज्य सरकारला निधी देण्यात यावा, सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जवळील सगळ्या बंदरांचा विकास करणे, मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणे, कोकण रेल्वेच्या स्थानकाची दुरुस्ती, देखभाल तसेच नूतनिकरण करणे, मुंबई व कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना अनुदान देण्यात यावे तसेच मुंबईत नवीन रुग्णालय व जुन्या रुग्णालयाच्या देखभाल दुरस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार वायकर (Ravindra Waikar) यांनी लोकसभेत केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.