गोहत्या थांबली नाही, तर कायदा हातात घ्यावा लागेल; विधानसभेत Nilesh Rane आक्रमक

60
गोहत्या थांबली नाही, तर कायदा हातात घ्यावा लागेल; विधानसभेत Nilesh Rane आक्रमक
गोहत्या थांबली नाही, तर कायदा हातात घ्यावा लागेल; विधानसभेत Nilesh Rane आक्रमक

महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. माझ्या मतदारसंघात, रत्नागिरी आणि बाजूच्या जिल्ह्यात हे उघड चालले आहे. यांचे रॅकेट आहे ते उघड धंदे करतात. आंदोलने केली, तरी हे थांबत नाही. अनेक आंदोलने झाली. आंदोलनात गुन्हे झाले; परंतु गोहत्या थांबत नाही. गोहत्येचा (gohatya bandi kayda) व्यापार थांबवला जात नाही. या लोकांवर कारवाई केली नाही, तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे, असा इशारा आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Maharera Inquiry : महारेराकडून रखडलेल्या प्रकल्पांसाठी बिल्डरवर कारवाई सुरू)

महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी

आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी (cow slaughter) आणावी अशी मागणी विधानसभेत केली आहे. आमदार नीलेश राणे म्हणाले की, आपले सरकार बहुमतात आहे. हिंदुत्वाचे सरकार आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचे संरक्षण करू शकलो नाही, तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत. त्यामुळे गोहत्या थांबली पाहिजे. ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी आमदार राणे (Nilesh Rane) यांनी मच्छिमारांच्या समस्येवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, मच्छिमारांची समस्या बिकट होत चाललीय. मच्छिमार कधीही प्रसिद्धी झोतात येत नाही. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या बोटी आहेत ज्या एलईडी फिशिंग करतात. त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला धोरण आखावे लागेल. फक्त २-४ गणवेशातील पोलिसांच्या बोटी पाठवून काही होणार नाही. असे प्रयोग झाले; पण काहीही थांबले नाही. अनेकदा आपल्या मच्छिमारांवर हल्ले झाले, तरी समोरच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. बाहेरच्या बोटींना इंधन कोण देतंय..? खासगी कंपन्या देतायेत. हे थांबले पाहिजे. जर या लोकांना रोखले नाही तर ते राजरोसपणे मच्छिमारी करतात त्यांच्यामुळे आपल्या पारंपारिक मच्छिमारांना काही मिळत नाही त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.