Ind vs Aus, Brisbane Test : जोश हेझलवूड उर्वरित मालिकेलाही मुकणार

Ind vs Aus, Brisbane Test : ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का आहे.

64
Ind vs Aus, Brisbane Test : जोश हेझलवूड उर्वरित मालिकेलाही मुकणार
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटी सध्या रंगतदार अवस्थेत असताना ऑस्ट्रेलियन संघाला एक मोठा धक्का बसला आहे. चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी व्यायाम करताना त्यांचा मुख्य तेज गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतग्रस्त झाला होता. दिवसभरात फक्त एक षटक टाकून तो मैदानाबाहेर गेला होता. आता त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावल्याचं निदान झालं आहे आणि त्यामुळे तो ही कसोटीच नाही तर उर्वरित मालिका खेळण्याची शक्यताही कमीच आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

सध्या ब्रिस्बेन कसोटीचाही एक दिवस बाकी आहे आणि भारतीय संघाला दुसऱ्या डावातही झटपट गुंडाळलं तर ऑस्ट्रेलियन संघाला विजयाची काहीशी आशा धरता येईल. पण, हेझलवूडच्या अनुपस्थितीत त्यांच्याकडे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हेच दोन तेज गोलंदाज उरतात आणि त्यांच्या जोडीला नॅथन लिऑन आणि ट्रेव्हिस हेड यांचा पर्याय ऑस्ट्रेलियाकडे आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचं आक्रमण ब्रिस्बेन कसोटीत काहीसं बोथट होणार आहे. शिवाय या मालिकेत पहिल्या कसोटीत हेझलवूड सगळ्यात प्रभावी ठरला होता. तो उर्वरित मालिकेत खेळला नाही तर ऑस्ट्रेलियन आक्रमणातील धार कमी होणार आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – UPI Credit Card : युपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय?)

ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ व्यायाम करत असतानाच हेझलवूडने पोटरी दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तो गोलंदाजीसाठीही उशिरा आला. जेमतेम एक षटक टाकून त्याने कर्णधाराशी चर्चा करत मैदान सोडलं. या षटकात त्याचा वेग कमीच झाला होता आणि धावतानाही अवघडलेपण जाणवत होतं. त्याच्या ऐवजी स्कॉट बोलंड ऑस्ट्रेलियन संघात येईल हे जवळ जवळ नक्की आहे. हेझलवूड कमरेच्या दुखापतीमुळे आधीची ॲडलेड कसोटीही खेळला नव्हता. आता ब्रिस्बेनमध्ये त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावला आहे. बोलंड बरोबरच ऑस्ट्रेलियाकडे सिन अबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचाही पर्याय आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

ब्रिस्बेन कसोटी सध्या अनिर्णित राहण्याचीच शक्यता आहे. कारण, भारतीय संघाने फॉलो-ऑन टाळला आहे. तर चौथी मेलबर्न कसोटी २६ डिसेंबरला सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरी यांनी हेझलवूडच्या दुखापतीविषयी दु:ख व्यक्त केलं असलं तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची ताकद त्यामुळे कमी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.