Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana : निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

88
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधी मिळणार?
  • ऋजुता लुकतुके

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही पुरवणी मागण्यांमध्ये एक महत्त्वाची मागणी होती ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) १४०० कोटी रुपयांच्या तरतुदीची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूरही केली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. आधीच्या १५०० रुपयांच्या तुलनेत योजनेतील लाभार्थ्यांना आता ६०० रुपये जास्त मिळणार आहेत. ते नेमके कधी ते बघूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै २०२४ मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेसाठी एकूण ४६ हजार कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र, योजना जुलै २०२४ ते मार्च २०२५ यासाठी एकूण ३६ हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. यापैकी १७ हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित १९ हजार कोटी शिल्लक आहेत.

(हेही वाचा – Maharera Inquiry : महारेराकडून रखडलेल्या प्रकल्पांसाठी बिल्डरवर कारवाई सुरू)

आताच्या पुरवणी मागणीत १४०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत १४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून २०,४०० कोटी रुपये शिल्लक आहेत. १४०० कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणीसांठी केलेल्या २१०० रुपयांच्या घोषणे संदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याच यावरुन स्पष्ट होतंय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे (Ladki Bahin Yojana) महिलांना दर महा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते. राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीनं महिलांना दरमहा २१०० रुपये देऊ असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपयांच्या बाबत भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार करु असं म्हटलं होतं, त्यामुळं लाडक्या बहिणींना २१०० रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पातच तशी तरतूद होऊ शकेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.