Car VIP Number : दुचाकीतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवण्यासाठी ‘हे’ करा

48
Car VIP Number : दुचाकीतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवण्यासाठी 'हे' करा
Car VIP Number : दुचाकीतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवण्यासाठी 'हे' करा

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pune Regional Transport Office) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचार्कीसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Car VIP Number)

(हेही वाचा – Priyanka Gandhi : बॅग व ती; आधी पॅलेस्टाईनचे समर्थन केले; नंतर बांगलादेशी अल्पसंख्यांकांचा कैवार घेऊन सावरले)

पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी तीनपट शुल्क

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी १९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जाचा लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये करण्यात येईल.

ही कागदपत्रे द्या

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डोडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ., पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे. (Car VIP Number)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.