Bank Loan Waive Off : बँकांनी १० वर्षांत तब्बल १२ लाख कोटींचं कर्ज केलं माफ

Bank Loan Waive Off : ही कर्जं मुख्यत्वे मोठ्या उद्योजकांची आहेत.

76
Bank Loan Waive Off : बँकांनी १० वर्षांत तब्बल १२ लाख कोटींचं कर्ज केलं माफ
  • ऋजुता लुकतुके

देशभरातील बँकांनी मागच्या १० वर्षांत सुमारे १२ लाख कोटी रुपयांची औद्योगिक कर्जं माफ केल्याचं समोर आलं आहे. संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडूनच ही माहिती समोर आली आहे. सामान्य कर्जदारांचं कर्ज थकल्यावर त्यासाठी मालमत्तेवर जप्ती आणणारी बँक इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्जं कशी माफ करते असा प्रश्न त्यामुळे पडणं स्वाभाविक आहे. पण, ही कर्ज ही मोठ्या उद्योजकांनी उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी घेतलेली आहेत आणि उद्योग बुडित निघाल्यामुळे कर्जाची परतफेड शक्य झालेली नाही. (Bank Loan Waive Off)

(हेही वाचा – Priyanka Gandhi : बॅग व ती; आधी पॅलेस्टाईनचे समर्थन केले; नंतर बांगलादेशी अल्पसंख्यांकांचा कैवार घेऊन सावरले)

या थकित कर्जांमध्ये अनिल अंबानी, जेपी उद्योग समुहाचे मालक जिंदाल यांचा समावेश आहे. भारत सरकारनं ससंदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीतून बँकांनी माफ केलेल्या कर्जाच्या रकमेची माहिती समोर आली आहे. गेल्या १० वर्षात बँकांनी १२ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. एखादा उद्योग बंद झाल्यास त्यावर घेतलेल्या कर्जासाठी तो समुह आणि बँक यांच्यात वाटाघाटी होऊन शक्य तितकी कर्ज वसुली आणि मग कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होते. कर्ज माफ होणं हे एक प्रकारे देशातील उद्योगधंद्यांची अवस्था अधोरेखित करत असते. कारण, फसलेल्या उद्योगांसाठीच कर्जमाफीची वेळ येते. (Bank Loan Waive Off)

(हेही वाचा – मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्याची Ravindra Waikar यांची संसदेत मागणी)

थकबाकीदारांचं कर्ज माफ करण्यामध्ये सर्वात पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या पाच वर्षात जवळपास दीड लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. थकलेल्या कर्ज माफ करण्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं प्रमाण जास्त आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या पाच वर्षात जवळपास दोन लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. तर,सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षात साडे सहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. कर्ज माफ करणं म्हणजे थकित कर्जाच्या वसुलीचे सर्व प्रयत्न संपल्यावर जी कर्ज वसुली शक्य नाही ती माफ करून ते खातं बंद करणं. (Bank Loan Waive Off)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.