Borivali Skywalk : बोरिवली स्कायवॉकवर आता नाही फेरीवाल्यांना थारा

649
Borivali Skywalk : बोरिवली स्कायवॉकवर आता नाही फेरीवाल्यांना थारा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरिवली पश्चिम येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात फेरीवाल्यांनी आता स्कायवॉकचा (Borivali Skywalk) आधार घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने प्रकाशित केल्यानंतर या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांनी विरोधात महापालिकेच्या मध्य विभागाने धडक कारवाई हाती घेतली आहे. या स्कायवॉकवर सोमवारपासून धडक कारवाई सुरू करण्यात आली असून यापुढे या ठिकाणी एकही फेरीवाला बसणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Borivali Skywalk : बोरिवलीतील स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी?)

बोरिवलीतील स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी? असे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने मागील शनिवारी प्रकाशित केले होते. बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी एस. व्ही. रोडवर कारवाई होत असल्याने आता फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर (Borivali Skywalk) व्यवसाय थाटण्यास सुरुवात केले. त्यामुळे आता नागरिकांना स्कायवॉकवरूनही चालण्यास मार्ग मोकळा मिळत नाही. बोरिवलीचे स्कायवॉक हे पादचाऱ्यांसाठी बांधले आहे की फेरीवाल्यांसाठी असा सवाल आता बोरिवलीकरांकडून उपस्थित केला जात असल्याची बाब या वृत्ताच्या माध्यमातून निदर्शनास आणली होती.

(हेही वाचा – Priyanka Gandhi : बॅग व ती; आधी पॅलेस्टाईनचे समर्थन केले; नंतर बांगलादेशी अल्पसंख्यांकांचा कैवार घेऊन सावरले)

या वृत्तानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता या स्कायवॉकवर (Borivali Skywalk) ठाण मांडलेल्या सर्व फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करत त्यांचे समान जप्त केले. मंगळवारीही ही कारवाई कायम होती. त्यामुळे बोरिवली पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील महापालिका मंडई, गोयल शॉपिंग सेंटरपासून ते ठक्कर मॉल, मोक्ष मॉलपर्यंतच्या पदपथावर मोठ्याप्रमाणात बसून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याने स्कायवॉकवर पथारी पसरवून जागा अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याने नागरिकांना स्कायवॉक (Borivali Skywalk) वरून चालता येत आहे. विशेष म्हणजे हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर समाजसेविका मिरा नायर यांनी स्थानिक नवनिर्वाचित भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचे या बातमीकडे लक्ष वेधले आणि त्यांनी तात्काळ उपायुक्त भाग्यश्री कापसे आणि आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांना याबाबत सूचित केल्यानंतर ही कारवाई तातडीने महापालिका प्रशासनाने केल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.