Assembly Winter Session : … आणि आमदाराने थेट सभागृहातच मंत्रिपदाची केली मागणी

92
Assembly Winter Session : या अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्ष नेता नाहीच!
  • नागपूर, विशेष प्रतिनिधी

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली. मला मंत्री केले नाही तर मला मतदारसंघात जाणे मुश्किल होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मंगळवारी विधानसभेत औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. बहुतांश आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील सार्वजनिक हिताचे मुद्दे मांडणे पसंत केले असताना शरद सोनवणे यांनी मात्र आपल्याला मंत्री करण्याची मागणी जाहीरपणे करून आमदारांना आश्चर्याचा धक्का दिला. (Assembly Winter Session)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधी मिळणार?)

मी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर मी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. मी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीमधून येतो. शिवनेरी हा किल्ला माझ्या मतदारसंघात आहे. आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जाहीर सभेच्या व्यासपीठावर आणले. मात्र, आतापर्यंत या शिवजन्मभूमीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही, अशी खंत सोनवणे यांनी व्यक्त केली. (Assembly Winter Session)

(हेही वाचा – Borivali Skywalk : बोरिवली स्कायवॉकवर आता नाही फेरीवाल्यांना थारा)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरीवर येतात आणि तिथे महाराष्ट्र हितासाठी नतमस्तक होतात. मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा शब्द मी मतदारसंघातील जनतेला दिला आहे. मी शिवजन्मभूमीचा असून मला मंत्रिमंडळात घ्या असे सांगायला कमीपणा वाटतो. मात्र, मी स्वतःसाठी काही मागत नाही. शिवजन्मभूमीचा आदर म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या विनंतीचा गांभीर्यपूर्वक विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत शरद सोनवणे यांनी आपली मंत्रिपदाची मागणी विधानसभेच्या पटलावर आणली. (Assembly Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.