Borivali Skywalk वरील लाद्या पुन्हा उखडल्या, पूल विभागाचे दुर्लक्ष

305
Borivali Skywalk वरील लाद्या पुन्हा उखडल्या, पूल विभागाचे दुर्लक्ष
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरिवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील स्कायवॉकवरील (Borivali Skywalk) जिन्यांच्या पायऱ्यांच्या लाद्या उखडल्यानंतर मागील जुलै महिन्यांमध्ये त्याची दुरुस्ती केल्यांनतर आता प्रत्यक्षात या पुलाच्या पृष्ठभागावरील लाद्याच उखडल्यामुळे या पुलावरुन नागरिकांना धडपडत चालण्याची वेळ आली आहे. या पुलाच्या देखभालीकडे पूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने यावरुन जाणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरदारांना या पुलावरून लक्षपूर्वक चालावे लागत आहे.

(हेही वाचा – MVA सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न; चौकशीसाठी सरकारने नेमली एसआयटी)

बोरिवली (पश्चिम) येथील एस. व्ही. मार्गावरील सध्या अस्तित्वात असलेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक (Borivali Skywalk) हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम. एम. आर. डी. ए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक सन २०१५ साली एम. एम. आर. डी. ए. कडून “जसे आहे तसे ” या तत्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार या स्कायवॉकची देखभाल महापालिकेच्यावतीने केली जात आहे. बोरिवली पश्चिम भागातील नागरिकांना एस. व्ही. रोडवरील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना धड चालता येत नाही म्हणून रेल्वे स्थानक थेट गाठण्यासाठी या स्कायवॉकचे बांधकाम करण्यात आले. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात याची योग्य देखभालच महापालिकेच्यावतीने योग्य प्रकारे केली जात नाही ही बाब ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने मागील जुलै २०२४ मध्ये निदर्शनास आणून येथील प्रत्येक जिन्यांवरील तुटलेल्या फुटलेल्या लाद्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.

(हेही वाचा – Bank Loan Waive Off : बँकांनी १० वर्षांत तब्बल १२ लाख कोटींचं कर्ज केलं माफ)

या वृत्तानंतर महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने या स्कायवॉकवरील सर्व जिन्यांवरील तुटलेल्या लाद्या दुरुस्त करून हे जिने चालण्यास सुयोग्य बनवले होते. परंतु या स्कायवॉकवर आता पाच महिन्यांनंतर पुन्हा उखडलेल्या आणि तुटलेल्या लाद्यांमुळे पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मोक्ष मॉलसमोल स्कायवॉकच्या (Borivali Skywalk) पृष्ठभागावरील या लाद्या नाममात्र निखळल्या गेल्या होत्या. परंतु हळूहळू या लाद्या निखळल्या गेल्या आणि एकाच ठिकाणी सहा ते आठ लाद्या उखडून त्याखालील रेती सर्वत्र पसरली जात आहे. परिणामी या लाद्यांवरुन चालताना नागरिकांना त्रास होत असून रेतीमुळे अनेकदा पादचाऱ्यांचे पाय घसरुन पडावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत असतानाही पूल विभागाचे याकडे लक्ष दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.