आमचे नाही, इंदिरा गांधींचे तरी ऐका; अमित शाहांनी Veer Savarkar यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसचे कान टोचले

72
आमचे नाही, इंदिरा गांधींचेही तरी ऐका; अमित शाहांनी Veer Savarkar यांच्यावर टीका करणाऱ्यांचे कान टोचले
आमचे नाही, इंदिरा गांधींचेही तरी ऐका; अमित शाहांनी Veer Savarkar यांच्यावर टीका करणाऱ्यांचे कान टोचले

सावरकरांविषयी काँग्रेसवाले जे बोलले, ते उद्गार मी बोलूही शकत नाही. त्यांना दिलेली वीर ही पदवी कोणत्या राजकीय पक्षाने दिलेली नाही. त्यांच्या वीरतेमुळे १४० लोकांनी दिलेली ही पदवी आहे.

तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण

ही देशभक्तीची वाक्ये ज्यांच्या मुखातून बाहेर आली, त्यांच्याविषयी काँग्रेसवाले अशा शब्दांत बोलतात. असे बोलणे गर्वाचे समजले जाते ? देशासाठी बलीदान देणे कोणत्या धर्मासोबत जोडला जाऊ शकतो का ? देशभक्ती, वीरता, समर्पण यांना धर्म, विचारधारा यांच्याशी जोडू नका. बलीदान हे बलीदान असते. देशाचे सार्वजनिक जीवन आपण कोणत्या स्तराला घेऊन गेलो आहोत ?, असा संतप्त प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.

(हेही वाचा – Assembly Winter Session : … आणि आमदाराने थेट सभागृहातच मंत्रिपदाची केली मागणी)

वाचून दाखवले इंदिरा गांधींचे पत्र

या वेळी अमित शाह यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनीच पंतप्रधान असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काढलेल्या गौरवोद्गारांचा दाखला दिला. अमित शाह यांनी त्यांची पत्रे सभागृहात वाचून दाखवली. ते म्हणाले, “इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असतांना १९६६ मध्ये वीर सावरकरांच्या निधनाविषयी होते, सावरकर हे महान व्यक्ती होते. त्यांचे नाव साहस आणि देशभक्तीचा पर्याय आहे. ते महान क्रांतीकारी होते, ज्यांनी अगणित लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले.

त्यानंतर बाखले यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधी म्हणतात की, वीर सावरकर यांनी ब्रिटीश सरकारच्या केलेल्या साहसी प्रतिकाराचे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. मी भारताच्या या असाधारण पुत्राच्या जन्मशताब्दीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देते.”

वीर सावरकरांचे (Veer Savarkar) वर्णन करतांना अमित शाह म्हणाले की, वर्ष १८५७ पासून १९४७ च्या स्वातंत्र्ययुद्धात जर कोणाला २ वेळा कारावास झाला असेल, तर ते वीर सावरकर आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शौचालय तोडून भर समुद्रात कोणी उडी मारली असेल, तर ते वीर सावरकर आहेत. एकाच कारागृहात २ भाऊ काळ्या पाण्याची शिक्षा ते भोगत होते. १० वर्षांत त्यांनी एकदाही एकमेकांना पाहिलेही नाही. असा देशभक्त मी कधी पाहिला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.