BMC : महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप बनवण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त

315
BMC : महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप बनवण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त
  • सचिन धानजी, मुंबई

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेच्यावतीने मोबाईल ॲप बनवण्यात येणार असल्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असली तरी प्रत्यक्षात आजही महापालिकेच्या आयटी विभागाच्यावतीने मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. आधी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे या ॲपची निर्मिती करण्यात विलंब झाल्याचे कारण विभागाने दिले असले तरी ही आचारंसहिता शिथिल झाल्यानंतरही आजही महापालिकेच्या आयटी विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

(हेही वाचा – Assembly Winter Session : … आणि आमदाराने थेट सभागृहातच मंत्रिपदाची केली मागणी)

महिलांची वैयक्तिक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गोपनीय असलेली माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत तसेच त्याचा दुरूपयोग टाळण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना व कार्यपद्धती राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या महिला सुरक्षिततेकरिता मोबाईल ॲप बनविण्यासाठी सन २०२४-२०२५ च्या अर्थसंकल्पात रुपये १०० कोटींची तरतूद केली होती. मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात आजमितीस महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला हे ॲप विकसित करण्यास वेळच मिळत नाही. (BMC)

(हेही वाचा – Borivali Skywalk वरील लाद्या पुन्हा उखडल्या, पूल विभागाचे दुर्लक्ष)

महिलांना स्वसंरक्षण करण्याकरिता प्रशिक्षण, शासनाच्या विविध योजनांबद्दल प्रचार प्रसिद्धी करणे, डिजीटल सुरक्षा ॲप बनविणे, संकटग्रस्त महिलांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा एका छताखाली पुरविणे, महिलांकरीता असणारे कायदे याकरिता जागृती करणे, महिला सुरक्षेच्या अनुषंगाने इतर आवश्यक उपक्रम व उपाययोजना याकरिता मुंबई महानगरपालिकेने नव्याने ॲप निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. मागील विधीमंडळाच्या अधिवेशनात श्रीकांत भारतीय यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्यावतीने या ॲपची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती दिली होती. लोकसभा आचारसंहितेमुळे या ॲपची निर्मिती पूर्ण होऊ शकली नाही, मात्र संचालक (माहिती तंत्रज्ञान) विभागाला ॲपची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अद्याप तरी या ॲपची निर्मिती करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसून ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.