-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने कसाबसा फॉलो ऑन वाचवला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप सिंग या शेवटच्या जोडीने कसोटीच्या चौथ्या दिवशी शेवटचा दीड तास खेळून काढत धावाही वाढवल्या. ३९ धावांची भागिदारी करत फॉलो ऑन टाळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या कसोटीत फॉलो ऑन टाळणं महत्त्वाचं होतं. कारण, भारताला दुसऱ्यांदा फलंदाजी करायला लावून पुन्हा एकदा झटपट गुंडाळायचं ही ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. आता दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करावीच लागेल. तर भारतीय संघाला कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावांत किमान दोन सत्र खेळून काढण्याची तयारी ठेवावी लागेल. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- BMC : महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप बनवण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त)
पण, मूळात आतापर्यंत कसोटीचे पहिले चार दिवस फक्त १९२ षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. त्यातही दुसरा दिवस वगळता एकदाही सलग तीन सत्र होऊ शकलेली नाहीत. अशावेळी पाचव्या दिवशी खेळ पूर्ण होण्याची शक्यता नेमकी किती आहे? हवामानाचा अंदाज असं सांगतो की, तशी शक्यता फक्त १० टक्के आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
कारण, ॲक्युवेदर या वेबसाईटनुसार, ब्रिस्बेनमध्ये बुधवारी सकाळच्या वेळी पावसाची शक्यता ९० टक्के आहे. शिवाय तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असलं तरी ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा राहील, असंही हवामान अंदाजात म्हटलं आहे. इतकंच नाही तर पाऊस १५.८ मिनी इतका पडेल अशी शक्यता असल्यामुळे शहरात पाणी साठण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Legislative Council Election : भाजपाचे राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती)
त्यामुळे बुधवारी पूर्ण वेळ खेळ होऊ शकेल आणि पुरेसा उजेड मैदानावर असेल अशी शक्यता कमीच दिसते आहे. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चौथ्या दिवशी चिकाटी दाखवत धावसंख्या २५० च्या पार नेली आहे. त्यामुळे संघाने फॉलो ऑन टाळला आहे. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यताच जास्त आहे. त्यातच पावसामुळे बराचशी षटकं वाया जाणार असतील तर निकाल अशक्यच आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community