राज्य सरकारकडून Ratan Tata यांचा सन्मान; कौशल्य विद्यापिठाला नाव देण्याचे विधेयक मंजूर

44
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (MSSU) आता दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. मंगळवारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (दुसरी दुरुस्ती) विधेयक २०२४ विधान परिषदेत (Legislative Council) चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Cabinet Minister Mangal Prabhat Lodha) यांनी मंगळवारी विधान परिषदेत रतन टाटा यांच्या नावावर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव देण्याचे विधेयक मांडले. यावरील चर्चेत विधान परिषदेतील विविध सदस्यांनी भाग घेतला.  (Ratan Tata)
विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर

या निर्णयाचे स्वागत करत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कै. रतन टाटा यांचे नाव देण्याचे ठरले. लोढा म्हणाले की, विविध क्षेत्र आणि उद्योगांच्या विकासात दिवंगत रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी वेळोवेळी नवीन उद्योगांना मदत केली आहे. उद्योग क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण “रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ” (Ratan Tata Maharashtra State Skills University) असे करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Legislative Council Election : भाजपाचे राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती)

(हेही वाचा – Legislative Council Election : भाजपाचे राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती)
दरम्यान या विधेयकावरील चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, सत्यजित तांबे (Satyajeet Tambe), सचिन यांनी भाग घेतला. यावेळी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आली. शेवटी हे विधेयक एकमताने मंजूर झाले.तसेच राज्य सरकारने २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.