-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीतील चौथा दिवस भारतीय संघासाठी कसोटीचा होता. कारण, फॉलो ऑनचं संकट घोंघावत होतं. तसं झालं असतं तर कसोटी गमावण्याचीही शक्यता होती. रवींद्र जडेजाने ७७ धावा करत हे संकट अडीच सत्र थोपवून धरलं होतं. सुरुवातीला राहुल आणि त्यानंतर जडेजा आणि नितिश रेड्डी यांनी निकराचे प्रयत्न केले. पण, तरीही कमिन्सच्या गोलंदाजीवर नितिश १७ धावा करून त्रिफळाचित झाला. शेवटची फलंदाजांची जोडी फुटल्यामुळे जडेजावरील दडपणही वाढलं. तो हवेत फटका खेळून बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ९ बाद २१३ अशी झाली. म्हणजेच फॉलो ऑन टाळण्याची जबाबदारी आता बुमराह आणि आकाशदीप या शेवटच्या जोडीवर होती. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- राज्य सरकारकडून Ratan Tata यांचा सन्मान; कौशल्य विद्यापिठाला नाव देण्याचे विधेयक मंजूर)
पण, भारतीय शेपूट ब्रिस्बेनमध्ये वळवळलं. बुमराह (१०) आणि आकाशदीप (२७) यांनी शेवटची ९ षटकं खेळून काढली, धावाही वाढवल्या आणि फॉलो ऑन टाळला. पावसाचा व्यत्यय असलेल्या या कसोटीत हे कसोटी वाचवण्यासारखंच होतं. त्यामुळे आकाशदीपने तौ चौकार मारल्यानंतर ड्रेसिंग रुममधील दडपण क्षणार्धात कमी झालं. गंभीर, रोहित आणि विराटसह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
पण, ड्रेसिंग रुममध्ये खरा जल्लोषाचा क्षण आला तो त्या पुढच्या षटकांत. एकदा फॉलो ऑन टळल्यावर आकाशदीपची बॅटही सुस्साट सुटली. पुढच्याच चेंडूवर त्याने कमिन्सला चक्क जोरदार षटकार चढवला. तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या विराट आणि रोहितचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. (Ind vs Aus, Brisbane Test)
Akash Deep makes sure India avoid the follow-on and then smashes Pat Cummins into the second level!#AUSvIND pic.twitter.com/HIu86M7BNW
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2024
रोहितच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं. तर विराट चेंडूकडे बघतच राहिला. समालोचकांनीही ड्रेसिंग रुममध्ये वेळेआधीच नाताळ साजरा झाल्याची प्रतिक्रिया दिली. संघावरील फॉलो ऑनचं दडपण कमी झाल्याचं ते प्रतीक होतं. दिवसभराचा खेळ संपला, तेव्हा आकाशदीप आणि बुमराह यांचं अभिनंदन करण्यासाठी रोहित आणि विराट सीमारेषेपर्यंत आले होते. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Oath ceremony: मंत्री होण्यासाठी मतदान केलेले नाही; नाराज होऊन अधिवेशनातून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा घणाघात)
विराट आणि रोहितचा ड्रेसिंग रुममधील हा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या कसोटीत विराट, रोहित आणि आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी निराशा केली असताना तळाच्या फलंदाजांनी २५० धावा करत भारतीय संघासाठी ही कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ५ बाद ५४ वरून भारतीय संधाने कणा कणाने किल्ला लढवत २५० धावांची मजल मारली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community