-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत जी अपेक्षा भारताच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीकडून होती, ती तळाच्या फलंदाजांनी पूर्ण केली. फलंदाजांनी निदान ऑस्ट्रेलियन तेज आक्रमणाचा प्रतिकार करावा, असं वाटत असताना जयसवाल, गिल, विराट आणि रोहित एकेरी धावसंख्येत बाद झाले. राहुल, जडेजा, नितिश, बुमराह तसंच आकाशदीप यांनी टिच्चून फलंदाजी करत एकेक धाव वाढवत नेली. फॉलो ऑन वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत भारतासमोर २७५ धावांचं लक्ष्य)
सगळ्यात रंगत निर्माण केली ती बुमराह आणि आकाशदीप यांनी ९ बाद २१३ अशी भारताची अवस्था असताना आकाशदीप मैदानात उतरला. फॉलो ऑन टाळण्यासाठी तेव्हा अजून ३३ धावांची गरज होती. पण, बुमराह आणि आकाशदीप दोघांनीही एका इराद्याने फलंदाजी केली. एकही खराब फटका त्यांनी खेळला नाही. सकारात्मक फलंदाजी केली. पुढील ९ षटकांमध्ये कुठलीही पडझड होऊ न देता फॉलो ऑन तर वाचवलाच शिवाय धावसंख्या २५० पार नेली. ऑस्ट्रेलियापेक्षा अजूनही १५० पेक्षा जास्त धावांची पिछाडी असली तरी फॉलो ऑन टाळणं महत्त्वाचं होतं. ते या शेवटच्या जोडीने केलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
कारण, ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन लादून ही कसोटी जिंकण्याची आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची संधी होती. बुमराह, आकाशदीप यांनी तो आनंद कांगारुंना मिळू दिला नाही. (Ind vs Aus, Brisbane Test)
#TeamIndia have avoided the follow-on. AUSTRALIA WILL HAVE TO BAT AGAIN!#AUSvINDOnStar 👉 3rd Test, Day 5 | 18th DEC, WED, 5:15 AM on Star Sports! #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/DqW3C9DMJX
— Star Sports (@StarSportsIndia) December 17, 2024
दोघांनी केलेली भागिदारी ही परदेशात २०२० नंतरची दहाव्या गड्यासाठीची दुसरी सर्वोत्तम भागिदारी आहे. भारताची दहाव्या जोडीने केलेली सर्वोत्तम भागिदारी २०२० मध्ये इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर केलेली ५० धावांची भागिदारी आहे. बुमराह आणि शमी यांनी तेव्हा नाबाद ८९ धावा केल्या होत्या. तर आकाशदीपच्या नावावरही विक्रमाची नोंद झाली आहे. आकाशदीपने ब्रिस्बेन खेळपट्टीवर अकराव्या क्रमांकाच्या फलंदाजाने केलेली वैयक्तिक तिसरी मोठी धावसंख्या रचली आहे. तर भारताकडून अकराव्या क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियातील ही दुसरी मोठी धावसंख्या ठरली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Illegal Tree Cutting Fine : विना परवानगी एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड ? सरकारची विधेयकाला स्थगिती)
शिवलाल यादव यांनी १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आकाशदीपचाच क्रमांक लागतो. तर ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवरही ग्लेन मॅग्रा (६१) आणि जोश हेझलवूड (३२) यांच्या मागोमाग आकाशदीपने सर्वाधिक २७ धावा केल्या आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)