फडणवीस-शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न; ‘त्या’ क्लिपच्या SIT चौकशीची Shambhuraj Desai यांची घोषणा

182
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा (Winter session 2024) मंगळवारी दुसरा दिवस होता. मंगळवारी सकाळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलक करत घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात विरोधी पक्षतेनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्याचा दावा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये (Shinde Fadnavis sting operation) करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. या व्हिडिओची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर (BJP group leader Pravin Darekar) यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, चौकशी मागणी केली होती. (Shambhuraj Desai)
संबंधित ऑडिओ क्लिप्स व एकूण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल व त्यात दोषी आढळल्यास तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली. तसेच या क्लिपमध्ये एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते संजय पुनामिया यांच्यावर गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याबाबत बोलत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. संबंधित क्लिप मी पेन ड्राइव्हमधून सभागृहात आणला आहे. संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते.

(हेही वाचा – Illegal Tree Cutting Fine : विना परवानगी एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड ? सरकारची विधेयकाला स्थगिती)

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Cabinet Minister Shambhuraj Desai) यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिलं. हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं असून पोलीस अधिकारी ऑडियो क्लिप (Sting operation sit inquiry) प्रकरणात आणि शिंदे-फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एसआयटी चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं. याशिवाय गरज भासल्यास माजी पोलीस महासंचालक संजय पांडे (Former DGP Sanjay Pandey inquiry) यांचीही चौकशी करण्यात येईल. यात पांडे थोडेजरी दोषी आढळून आले तर, त्यांच्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन यावेळी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.