-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेनमध्येच काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहने एका पत्रकाराला मजेशीर उत्तर दिलं होतं. ‘माझ्यातील फलंदाजीच्या क्षमतेला तुम्ही आव्हान देत आहात,’ असं तो म्हणाला होता. तेव्हा उत्तर दिल्यावर बुमराहही हसला होता. पण, मंगळवारी बुमराहने फॉलो ऑन वाचवणारी नाबाद १७ धावांची खेळी केल्यावर बुमराचं हेच उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. बुमराहने गोलंदाजीतील आपली हुकुमत पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच सिद्ध केली होती. आता फलंदाजीतील जबाबदारीही त्याने पार पाडलेली दिसली. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : फॉलो ऑन टळला…आणि आकाशदीपच्या षटकारावर ड्रेसिंग रुममध्ये असा आनंद साजरा झाला!)
पत्रकाराचा प्रश्न काहीसा असा होता, ‘बुमराह, भारतीय फलंदाजीबद्दल तुला नेमकं काय वाटतं? खरंतर मला ठाऊक आहे, फलंदाजीवर बोलण्यासाठी तू योग्य व्यक्ती नाहीस. पण, तू यावर सांगू शकशील का?’ असं पत्रकाराने विचारताच बुमराहने वरील उत्तर दिलं होतं. (Ind vs Aus, Brisbane Test)
🗣 “𝙂𝙊𝙊𝙂𝙇𝙀 𝙒𝙃𝙄𝘾𝙃 𝙋𝙇𝘼𝙔𝙀𝙍 𝙃𝘼𝙎 𝙈𝙊𝙎𝙏 𝙍𝙐𝙉𝙎 𝙄𝙉 𝘼 𝙏𝙀𝙎𝙏 𝙊𝙑𝙀𝙍” – #JaspritBumrah knows how to handle tricky questions, just as he tackles tricky batters, speaking about his batting prowess, and the support he gets from the team’s bowlers! 👊
Excited… pic.twitter.com/uDX1P2NpRw
— Star Sports (@StarSportsIndia) December 16, 2024
‘तुमचा प्रश्न चांगलाच आहे. पण, तुम्ही माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. गुगल केलंत तर तुम्हाला कळेल, एका षटकांत सर्वाधिक धावा कुणी केल्यात ते!’ असं उत्तर तेव्हा बुमराहने दिलं होतं. ते उत्तर गाजलंही होतं. पण, मंगळवारी बुमराहने मैदानात त्या पत्रकाराला उत्तर दिलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे अखेर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित, मालिका १-१ बरोबरीत)
शिवाय बुमराहने दिलेल्या उत्तरातही तथ्य आहे. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकांत ३५ धावा वसूल करण्याची कामगिरी करताना जसप्रीत बुमराहच खेळपट्टीवर होता. पण, त्यापेक्षा मोलाची कामगिरी बुमराहने ब्रिस्बेनमध्ये बजावली. कसोटी क्रिकेटमध्ये ४३ डावांमध्ये बुमराहने ७ च्या सरासरीने ३१० धावा केल्या आहेत. पण, संघाला गरज असताना तो अनेकदा खेळपट्टीवर उभा राहिला आहे. बुमराहने दिलेलं उदाहरण लॉर्ड्स कसोटीचं होतं, जेव्हा बुमराह आणि शमीने शेवटच्या गड्यासाठी ५० धावांची भागिदारी रचली होती. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community