Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘Radio caller’

39
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Andhari Tiger Reserve) बफर झोनमध्ये आणखी दोन नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांच्या हालचालींवर आणि ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ करणे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर (Radio caller) केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : फॉलो ऑन टळला…आणि आकाशदीपच्या षटकारावर ड्रेसिंग रुममध्ये असा आनंद साजरा झाला!)

‘रॅपिड रेस्क्यू टीम’ (Rapid Rescue Team) आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) च्या संयुक्त विद्यमाने मुल (बफर) अंतर्गत केसलाघाट जंगलात (Keslaghat forests) केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी वाघिणीचे दोन नर शावक टी-२९ (के -निशाण) रेडिओ कॉलर केले गेले. याआधी टी-२९ वाघिणीचे शावक आणि टी-१६२ चे दुसरे शावक यांना बुधवारी अशाच संयुक्त ऑपरेशनमध्ये ‘रेडिओ कॉलर’ केले होते.

ताडोबा अंतर्गत जवळजवळ सर्व भाग मोठ्या संख्येन वाघांनी आधीच व्यापलेला असल्याने, कॉलर केलेले शावक प्रकल्पातून बाहेर पडण्याची आणि आजूबाजूच्या जंगलात जाण्याची शक्यता जास्त आहे. या वाघांच्या हालचालींचा मागोवा घेतल्याने केवळ त्यांच्या हालचालींच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात मदत होणार नाही, तर वन्यजीव, कॉरिडॉरचे मॅपिंग करण्यात आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यात मदत होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – फडणवीस-शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न; ‘त्या’ क्लिपच्या SIT चौकशीची Shambhuraj Desai यांची घोषणा)

सदर उपक्रम ‘लॉन्ग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’, (Long Term Monitoring of Tigers) ‘को-प्रिडेटर्स’ (Co-predators) आणि’ प्रे स्पीसीज इन टीएटीआर ॲण्ड ॲण्डजाईनिंग लँडस्केप्स’ (Prey species in TATR and engineering landscapes) या चालू संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. हा राज्य सरकारच्या मान्यतेने २०१४ पासून सुरु आहे. प्रकल्पातील पुढील प्रगती अतिरिक्त ‘रेडिओ कॉलर’ खरेदी करण्यावर अवलंबून आहे. संबंधित रेडियो कॉलर हे आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून प्राप्त केले जातात. ताडोबा निरीक्षण आणि संशोधन प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी लवकरच आणखी १० कॉलरसाठी ‘ऑर्डर’ देण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.