Ashwin Retires : रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, उर्वरित मालिकेतूनही माघार

Ashwin Retires : ब्रिस्बेन कसोटीत अश्विनने तडकाफडकी हा निर्णय जाहीर केला

77
Ashwin Retires : रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, उर्वरित मालिकेतूनही माघार
Ashwin Retires : रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, उर्वरित मालिकेतूनही माघार
  • ऋजुता लुकतुके

पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. मालिकाही १-१ अशी बरोबरीत असतानाच कसोटीच्या शेवटच्या दिवशी रविचंद्रन अश्विनने धक्कादायकरित्या आपली निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्माच्या बरोबरीने अश्विन पत्रकार कक्षात आला. काही वाक्यांमध्ये त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं. ‘माझ्यात काही क्रिकेट अजून बाकी आहे. पण, ते मी क्लब स्तरावर खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी तीनही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे,’ असं अश्विनने जाहीर केलं.  (Ashwin Retires)

 उर्वरित दोन कसोटींतही अश्विन नसणार हे स्पष्टच आहे. आयसीसीच्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल असताना अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत पहिल्या पर्थ कसोटीत जाडेजाच्या बरोबरीने अश्विनलाही संघातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर दिवस – रात्र झालेल्या ॲडलेड कसोटीत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं. पण, तो आपली चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे उर्वरित मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता तशी कमीच होती. अशावेळी अश्विनने विचारपूर्वक मालिकेच्या मध्यावरच निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताचा कसोटीतील सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू म्हणून अश्विनचं नाव घेतलं जाईल. (Ashwin Retires)

 अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर फिरकीची धुरा रवीचंद्रन अश्विनने आपल्या हातात घेतली होती. आपल्या कारकीर्दीत भारताकडन तो १०६ कसोटी सामने खेळला. यात त्याने २३ त्या सरासरीने ५३७ बळी मिळवले. अनिल कुंबळे्च्या ६१९ बळींनंतर अश्विन भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी गोलंदाज ठरला आहे. शिवाय अश्विनने कसोटीत ६ शतकांसह एकूण ३,४७४ धावाही केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ आणि टी-२० मध्ये ७२ बळी त्याच्या नावावर आहेत. (Ashwin Retires)

(हेही वाचा- फडणवीस-शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न; ‘त्या’ क्लिपच्या SIT चौकशीची Shambhuraj Desai यांची घोषणा)

नुकत्याच आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत चेन्नई सुपरकिंग्ज फ्रँचाईजीने ९.७५ कोटी रुपये मोजून अश्विनला आपल्या ताफ्यात कायम ठेवलं आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगाम तो खेळणार हे नक्की आहे. ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी अश्विनच्या निवृत्तीची कुण कुण काही प्रमाणात लागली होती. (Ashwin Retires)

 पावसामुळे खेळ थांबलेला असताना विराट आणि अश्विन ड्रेसिंग रुममध्ये शेजारी शेजारी बसले होते. दोघं बराच वेळ काही चर्चा करताना दिसले. शेवटी विराटने अश्विनच्या गळ्याभोवती हात घालत त्याला हसून आलिंगन दिलं. दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. त्यावरून अश्विनच्या निवृत्तीची चर्चाही सुरू झाली होती. ती नेमकी खरी ठरली आहे. अश्विन आता ब्रिस्बेन कसोटीनंतर काही दिवसांत भारतात परतणार आहे. (Ashwin Retires)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.