-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी दहाव्या जोडीसाठी ३९ धावांची भागिदारी करून जवळ जवळ ही कसोटीच भारतासाठी वाचवली आहे. आतापर्यंत या कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचे पहिलेच डाव पूर्ण झाले आहेत. त्यात बुमराह चेंडू आणि बॅट अशा दोन्हीच चमकला आहे. आधी त्याने ७६ धावांत ५ बळी मिळवले. तर फलंदाजी करताना मोलाच्या १७ धावा करत त्याने फॉलो ऑन वाचवला. या खेळीपूर्वी एक दिवस आधी पत्रकार परिषदेत त्याने गंमतीने बोलताना, एका पत्रकाराला, ‘माझ्या फलंदाजीविषयीची माहिती गुगलवर जाऊन घे,’ असं सुनावलं होतं. रोख गंमतीचा असला तरी आता बुमराहचं ते उत्तर व्हायरल होतंय. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत दहाव्या खेळाडूसाठी बुमराह, आकाशदीपची विक्रमी भागिदारी)
‘तुमचा प्रश्न चांगला आहे. पण, तुम्ही माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्न विचारत आहात. एका षटकांत सर्वाधिक धावा कुणी केल्यात हे गुगलला विचारा आधी,’ असं म्हणत बुमराह हसला होता. त्यावर गुगलनेही एक ट्विट करत आपलं उत्तर दिलं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
I only believe in Jassi Bhai 💪 https://t.co/Vs0WO5FfdJ
— Google India (@GoogleIndia) December 17, 2024
‘आमचा फक्त जस्सीभाईवरच विश्वास आहे! (गुगल करण्याची गरज नाही)’ असं गुगलने म्हटलं आहे. बुमराहच्या त्या उत्तरामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून तो किती मुरला आहे हे प्रतित होतं. पत्रकारांना कशी उत्तरं द्यायची हे तो आता शिकला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज असण्याबरोबरच तो संघाचा उपकप्तानही आहे. त्यामुळे मैदानाबाहेरचं दडपण हाताळण्याची हातोटीही त्याने मिळवली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘Radio caller’)
बुमरा जी आकडेवारी सांगत होता, ती आहे २०२० च्या लॉर्ड्स कसोटीची. या कसोटीत बुमरा आणि महम्मद शामी यांनी दहाव्या गड्यासाठी ८९ धावांची नाबाद भागिदारी रचली होती. तर याच मालिकेत स्टुअर्ट ब्रॉ़डच्या एका षटकांत बुमराने ३५ धावा केल्या होत्या. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community