ठाणे शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा (Thane robbery jeweler’s shop) टाकल्याची घटना समोर आली आहे. दोन आरोपींनी या दुकानात प्रवेश करून तब्बल 7 कोटी रुपये किमतीचे 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) बुधवारी ही माहिती दिली असून, या प्रकरणामुळे ठाण्यात सध्या खळबळ उडाली आहे. (Thane Gold theft)
नेहमीप्रमाणे या दुकानाचे मालक वामन मराठे हे १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास नौपाडयातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Thane) परिसरातील हे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी आपल्या दुकानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरटयांनी ‘अभिवादन’ बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या या दुकानाचे तळमजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील अशी दोन शटर तोडून आत शिरकाव केला. नौपाडा पोलिसांनी (Naupada Police) सांगितले की, ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका दुकानात मंगळवारी रात्री दीड ते चारच्या सुमारास हा दरोडा पडला. चोरट्यांनी प्रथम दुकानाच्या पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि नंतर बळजबरीने दुकानाचे शटर उघडून आतमध्ये ठेवलेले दागिने लंपास केले. दुकानात सुरक्षा उपायांचा अभाव होता. असे एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्वेलर्स रात्रभर तिजोरीत महागडे दागिने ठेवत असतानाही, या दुकानात मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवल्या गेल्यामुळे चोरट्यांना अल्पावधीत चोरी करणे सोपे झाले.
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या फॉलो ऑन वाचवणाऱ्या कामगिरीनंतर मीडियाबरोबरचा संवाद होतोय व्हायरल )