- प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांच्या अलीकडच्या काळात भेटीगाठी वाढल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या या गाठीभेटी मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने होत आहे. मात्र, दोन बड्या नेत्यांच्या भेटीत काहीतरी मोठं शिजते असं म्हणतात. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण येणे स्वाभाविक आहे. बुधवारी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आणि साहित्य संमेलनांचे निमंत्रण देण्यासाठी भेटलो असल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. शरद पवार यांचे वक्तव्य किंवा भेटीमागचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर किमान सहा महिने प्रतीक्षा करावी लागते असं म्हणतात. अर्थात भेटीचा परिणाम सहा महिन्यानंतर दिसून येतो तेव्हा भेटीमागचा खरा हेतू लक्षात येतो. (PM Modi-Sharad Pawar Meet)
Rajya Sabha MP and former Union Minister Shri Sharad Pawar, along with a group of farmers, met PM @narendramodi today.@PawarSpeaks pic.twitter.com/zAYUz06KCH
— PMO India (@PMOIndia) December 18, 2024
(हेही वाचा – Manipur Violence : आतंकवाद्यांकडे स्टारलिंक कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस; एलन मस्क यांचे कानावर हात)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या सध्याच्या भेटीत भविष्यात खेळले जाणारे डावपेच तर आखले जात नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यसभेत भाजपा बहुमतात आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे राज्यसभेत तीन खासदार आहेत. याउलट लोकसभेत भाजपाचे २४० खासदार आहेत. यामुळे भाजपाला घटक पक्षांच्या मदतीची गरज जास्त आहे. लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाचे नऊ खासदार आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाचा फक्त एक खासदार आहे. अशात, शरद पवार यांचा पक्ष भाजपासाठी जास्त महत्त्वाचा आहे. यामुळे, पंतप्रधान आणि पवार यांची भेट फार बोलकी आहे. शिवाय राजकारणात कुणी कायमचा मित्र नसतो आणि कुणी कायमचा शत्रू नसतो असे म्हणतात. राजकारणात कधी काय घडेल याचाही नेम नसतो. शिवाय, शरद पवार यांनी यापूर्वी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केलीच होती. (PM Modi-Sharad Pawar Meet)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या फॉलो ऑन वाचवणाऱ्या कामगिरीनंतर मीडियाबरोबरचा संवाद होतोय व्हायरल )
तब्बल ७० वर्षानंतर देशाची राजधानी दिल्लीत होणारे 98 वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधानाच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल अशी आशा व्यक्त केली. सरहदने अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ वे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत केले आहे. संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. ७० वर्षानंतर दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना केली. (PM Modi-Sharad Pawar Meet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community