ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता भारताला किती संधी?

ICC Test Championship : ब्रिस्बेन कसोटीनंतर कसोटी अजिंक्यपदाची क्रमवारी काय सांगते?

71
ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता भारताला किती संधी?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत पराभव टाळला असला तरी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासमोरचं आव्हान कठीण झालं आहे. ब्रिस्बेन कसोटीत पावसामुळे जवळ जवळ अडीच दिवसांचा खेळ वाया गेला आणि परिणामी, कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघांना त्यासाठी प्रत्येकी ४-४ गुण मिळाले. भारताला पराभव टाळता आला असला तरी संघाची उर्वरित वाटचाल आणखी कठीण झाली आहे. अजिंक्यपद क्रमवारीतील ताजी गुणसंख्या बघूया, (ICC Test Championship)

(हेही वाचा – PM Modi-Sharad Pawar Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार भेटीमुळे दिल्लीतील पारा वाढला)

New Project 2024 12 18T145131.672

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या ‘गुगल करा’ उत्तराला गुगलनेही दिला प्रतिसाद)

सध्या या तीन संघांनाच आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे आणि यातही दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड आहे. त्यांना २६ डिसेंबरपासून पाकिस्तानबरोबर मायदेशातच दोन कसोटी खेळायच्या आहेत आणि या मालिकेत बरोबरी जरी झाली तरी त्यांचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. तर दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत २ कसोटींची एक मालिका खेळायची आहे. त्यांनी भारताविरुद्ध मालिका ३-१ ने जिंकली तर ते थेट अंतिम फेरीत पोहोचतील आणि जर ही मालिका ते हरले तर श्रीलंकेविरुद्ध किमान एक कसोटी त्यांना जिंकावी लागेल. (ICC Test Championship)

(हेही वाचा – Thane Gold theft: ठाण्यातील दागिन्यांच्या दुकानात चोरी; 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले)

तर भारतासाठी पुढील वाटचाल अडचणीची असणार आहे. त्यांना अंतिम फेरीतील प्रवेशासाठी पुढील दोनही कसोटी जिंकाव्याच लागतील. त्या जिंकल्या तर त्यांना थेट आगेकूच करता येईल आणि तसं झालं नाही ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेनेही पाकिस्तान विरुद्ध एक कसोटी सामना गमवावा अशी अपेक्षा भारताला धरावी लागेल. (ICC Test Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.