मुंबई करांची सेकंड लाईफ लाइन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस (BEST Bus) संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अगदी कमी पैशात आणि इच्छित स्थळी नेऊन सोडणाऱ्या या बेस्ट बसच्या ताफ्यातील बसची संख्या घटल्याने विविध बसमार्गांवरील बससेवा बंद (BEST route closed) करण्याची नामुष्की बेस्ट उपक्रमावर आली आहे. तर गेल्या चार वर्षांत बेस्टने शहरातील ७३ मार्गावरील बससेवा बंद केली आहे. तर यंदा वर्ष २०२४ मध्ये नऊ बसमार्गांवरील सेवा खंडीत केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीच्या (Rickshaw-taxi meter charges) खर्चिक प्रवासाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. सध्या मुंबईत केवळ ४३० बसमार्ग सुरु आहेत. (BEST Bus)
(हेही वाचा – PM Modi-Sharad Pawar Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार भेटीमुळे दिल्लीतील पारा वाढला)
मुंबईकरांना शहरात (Mumbai Best Bus) फिरण्यासाठी, कार्यालय ते घर दरम्यानच्या प्रवासासाठी, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी बेस्टची बस अत्यंत सोयीची आहे. बेस्टचे तिकिट देखील पाच रुपये असल्याने ते सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे बेस्टच्या (Best bus) प्रवासाला मुंबईकर प्राधान्य देतात. परंतु गेल्या काही वर्षांत तोटा कमी करण्यासाठी बेस्टने स्वमालकीच्या बस खरेदी न करता भाडेतत्वावरील बस ताफ्यात सामावून घेतल्या. त्यामुळे बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या घटली.
दहा वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार बस आणि दैनंदिन प्रवासी संख्या ५५ लाख होती. सध्याच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात ३ हजार १६६ बस आहेत. त्यापैकी २ हजार ८१ बस भाडे तत्त्वावरील, तर स्वमालकीच्या सुमारे एक हजार बस आहेत. त्यातून दिवसाला २८ लाख प्रवासी प्रवास करतात. २०२६ पर्यंत ७ हजार बसचा ताफा होईल असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येतो.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण)
यात २०० डबलडेकर बसचा (Double decker bus) समावेश आहे. मात्र आतापर्यंत केवळ ५० डबलडेकर बस दाखल झाल्या असून ७०० बसचा पुरवठा करणाऱ्या कॉसिस कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बसची संख्या तीन हजारांवर अडकली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community