इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी…

98
इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी...
इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी...

बांगलादेशमध्ये इस्लामिक धर्मांधांकडून अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याचे एक हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याबाबत बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील रवींद्र घोष (Ravindra Ghosh) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले, इस्कॉनचे (ISKCON) संत चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) हे बांगलादेशच्या ‘समिलित सनातनी जागरण जोते’चे प्रवक्ते असून नोव्हेंबर महिन्यात त्यांना ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर देशद्रोह आणि इतर खोटे आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेशचे (Bangladesh) अंतरिम सरकार आणि कट्टरवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले कारण ते हिंदू (Hindu) समाजाचे संघटन करत होते आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवत होते.

( हेही वाचा : PM Modi-Sharad Pawar Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार भेटीमुळे दिल्लीतील पारा वाढला

इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांच्या बाजू न्यायालयात रवींद्र घोष (Ravindra Ghosh) मांडत आहे. मात्र बांगलादेश न्यायालयात त्यांच्यावरच हल्ला झाल्याचे आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर उपचारानंतर रवींद्र घोष नुकतेच भारतात आलेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला. तसेच रवींद्र घोष बांगलादेशात झालेल्या हल्ल्यानंतर वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने ते कोलकाताजवळील बराकपूर येथे आपल्या मुलाकडे आले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याची एक हजारहून अधिक प्रकरणे असल्याचे सांगत. आम्ही पीडितांसाठी लढू, असा (Ravindra Ghosh) ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

४० वकिलांच्या गटाचा घोष यांच्यावर हल्ला

चितगाव कोर्टात आपल्यावर झालेल्या गैरवर्तनाचा संदर्भ देत रवींद्र घोष (Ravindra Ghosh) म्हणाले की, सुमारे ४० वकिलांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचे म्हणणे होते की, कोणीही दास यांचा खटला लढू नये. त्यामुळे हिंदू वकिलांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत, जेणेकरून तेही मागे हटतील. तसेच घोष (Ravindra Ghosh) यांना त्यावेळी स्थानिक पोलिसांनी वाचवले, मात्र बांगलादेशातील हिंदू वकील आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याचे घोष यांनी सांगितले. (Chinmoy Krishna Das)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.