उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिप्पणी केली. मुख्यंत्र्यांना कुणीही भेटू शकते, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्ष तसेच इतर पक्षाचे नेतेही भेटतात. मात्र जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये अमुलाग्र बदल दिसतोय, असे शिंदे म्हणाले. ह्याला भेट, त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशानाच्या तिसऱ्या दिवशी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीसह, विरोधकांकडून ईव्हीएमबाबत सुरू असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी का केली नाही, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
लोकसभेनंतर विरोधक हुरळून गेले होते मुख्यंत्र्यांना कुणीही भेटू शकते, मुख्यंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्ष तसेच इतर पक्षाचे नेतेही भेटतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर दिली. टोकाची टीका करणारे, संपविण्याची, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसतोय. ही चांगली गोष्ट आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. लोकसभेतील विजयानंतर विरोधक हुरळून गेले होते. त्यांनी मंत्रिमंडळी ठरवले होते, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. ह्याला भेट, त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट, अशी ही परंपरा आहे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
Join Our WhatsApp Community