- ऋजुता लुकतुके
ओपन एआय कंपनीने चॅटजीपीटीवर आधारित आपलं सर्च इंजिन ग्राहकांसाठी मोफत केलं आहे. त्यामुळे सर्चच्या बाबतीत गेली काही दशकं आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीच्या वर्चस्वाला काहीसा धक्का बसला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात चॅटजीपीटीने आपली सर्च सेवा सुरू केली होती. पण, आतापर्यंत ही सेवा फक्त नोंदणीकृत ग्राहकांसाठीच होती. आता ही सेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे आणि तिची स्पर्धा थेट गुगलशी असणार आहे. (ChatGPT Search)
(हेही वाचा – इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी…)
When you use ChatGPT as the default search engine in your browser, we’ve made it faster to get to where you want to go on the web. pic.twitter.com/q5N38GUPjS
— OpenAI (@OpenAI) December 16, 2024
‘चॅट जीपीटी वापरणाऱ्या सगळ्या व्यासपीठावर आता तुम्हाला चॅटजीपीटी सर्च करून अचूक आणि थेट माहिती मिळवता येईल. तुम्हाला मिळणारी माहिती अतीजलद आणि सतत अपडेट होणारी असेल,’ असं ओपन एआयचे प्रोडक्ट ऑफिसर केविन वेल यांनी एका व्हिडिओतून सांगितलं आहे. (ChatGPT Search)
(हेही वाचा – ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता भारताला किती संधी?)
चॅटजीपीटी सर्च हा आताच्या सेवेचाच एक भाग असेल. वेगळा सर्च ब्राऊजर त्यासाठी सुरू केला जाणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा सर्च असेल आणि यात तुम्हाला कमीत कमी वेळेत आवश्यक त्या वेब लिंक समोर दिसतील. शिवाय यात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती असणार नाहीत. त्यामुळे चॅटजीपीटी सर्च दिसायला अतिशय स्वच्छ आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सर्चसाठी सध्या ओपन एआय, गुगल (जेमिनाय) आणि मायक्रोसॉफ्ट (अझुरी) यांच्यात सध्या जोरदार चुरस आहे. (ChatGPT Search)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community