मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील (Gateway of India) समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा जवळपास १०९ प्रवासी होते. त्यातील ९८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. याप्रकरणात १२ जणांचा मृत्यू झालेला असून ४ जण गंभीर अवस्थेत आहेत.
(हेही वाचा : इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी…)
प्राथमिक माहितीनुसार, ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून (Gateway of India) घारापुरी बेटाच्या (एलिफंटा) दिशेने जात होती. मात्र समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली. JOC येथून प्राप्त माहितीनुसार घारापुरी बेटे (Elephanta Caves) येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये १०९ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या साहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे.
दरम्यान बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजुबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचावकार्य सुरु केले. त्यातच नीलकमल बोट पूर्णपणे बुडाल्याने प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.(Gateway of India)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community