- खास प्रतिनिधी
Nagapur : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार दिवस झाले. खातेवाटप अद्याप झाले नसले तरी मुंबई शहरातील आणि उपनगरातील प्रत्येकी एका आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांनाच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा नागपूरच्या विधानभवन परिसरात होत आहे. (Assembly Winter Session)
लोढा आणि शेलार पालकमंत्री
रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी ३९ आमदारांनी नागपूर येथील राज भवनच्या प्रांगणात मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई शहरातील ओपेरा हाऊस विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आणि वांद्रे पश्चिमचे आशिष शेलार यांचाही त्यात समावेश होता. रविवारपासून अद्याप मंत्र्यांना खातेवाटप झाले नाही. पण लोढा आणि शेलार यांच्या पालकमंत्री पदाची चर्चाही सुरू झाली. (Assembly Winter Session)
(हेही वाचा – ChatGPT Search : ओपन एआय कंपनीने चॅटजीपीटी सर्च इंजीन केलं सुरू, गुगलपासून ते कसं वेगळं आहे?)
अडीच वर्षे कोकणातील पालकमंत्री
लोढा यांच्याकडे मुंबई शहर आणि शेलार यांच्याकडे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याच येईल, अशी चर्चा सुरू झाली. गेली अडीच वर्षे शिंदे सरकारमध्ये मुंबई शहराचे पालकमंत्रीपद कोकणातील आमदार, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते. आता केसरकर मंत्रिमंडळात नाहीत. (Assembly Winter Session)
महानगरपालिका ‘लक्ष्य’
पुढील पाच महिन्यांत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह अन्य बहुतांश महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून भाजपाचे मुंबई हे ‘लक्ष्य’ असल्याने मुंबईचे पालकमंत्रीपद अन्य पक्षांना भाजपा देईल, याची शक्यता कमी दिसत असल्याची चर्चा आहे. (Assembly Winter Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community