Smart Electricity Meter बाबत पुनर्विचार करण्याची भाजपाची बेस्टकडे मागणी

64
Smart Electricity Meter बाबत पुनर्विचार करण्याची भाजपाची बेस्टकडे मागणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहरांत घरगुती वापराच्या विजेसाठी स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यात येत आहेत. याबाबत बेस्ट उपक्रमाकडे वारंवार वाढीव बिलाच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने या विद्युत स्मार्ट मीटर (Smart Electricity Meter) बाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने बेस्ट महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बेस्ट उपक्रमाच्यावतीने मुंबईतील वीज वापराच्या स्मार्ट विद्युत मीटरबाबतच्या तक्रारी येत असल्याने भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव आणि राजेश्री शिरवडकर यांच्या शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना निवेदन देत ग्राहकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे दुर्लक्ष; आयुक्तांचे आदेश केवळ कागदावरच)

या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईतील अनेक वीज ग्राहकांकडून स्मार्ट विद्युत मीटर (Smart Electricity Meter) बसविल्यापासून वाढीव वीज बिल आकारणी होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बेस्ट उपक्रमातील पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. परिणामी मुंबई शहरातील घरगुती वीज ग्राहकांना नाहक वाढीव बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

या तक्रारी बेस्ट उपक्रमाकडेही प्राप्त झालेल्या आहेत. त्याची खातरजमा करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. व आपण केलेल्या कार्यवाहीची माहिती तपशीलवार आम्हाला अवगत करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच बाबत बेस्ट उपक्रमाकडे वारंवार वाढीव बिलाच्या तक्रारी प्राप्त होत असतील तर विद्युत स्मार्ट मीटर (Smart Electricity Meter) बाबत पुनर्विचार करण्यात यावा अशीही विनंती करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.