Unauthorized Constructions : बेहराम पाडा, गरीब नवाज नगरमध्ये झोपड्यांचे टॉवर बनले, आम्ही नाही पाहिले

302
Unauthorized Constructions : बेहराम पाडा, गरीब नवाज नगरमध्ये झोपड्यांचे टॉवर बनले, आम्ही नाही पाहिले
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा आणि गरीब नवाज नगरसह भारत नगर आदी मुस्लिम वस्त्यांमध्ये झोपड्यांचे टॉवर उभे राहत असताना महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने पुरते डोळे बंद करून घेतले आहे. बेहराम पाड्यामध्ये पाच ते सहा मजली झोपड्या उभ्या राहत असताना यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तसेच गरीब नवाज नगरमधील झोपड्यांनी आता रेल्वेच्या पुलाला विळखा घातलेला असतानाही रेल्वे प्रशासन त्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याने या वस्त्यांना अनधिकृत बांधकामे करण्याचे सर्टीफिकेटच महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने दिले आहे असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

वांद्रे पूर्व येथील बेहराम पाड्यांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे (Unauthorized Constructions) होत असतानाच काही वर्षांपूर्वी याठिकाणी आग लागून अनेक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालिन सरकारच्या पुढाकाराने म्हाडाच्या झोपडपट्टी व सुधार मंडळाच्यावतीने या जळून खाक झालेल्या झोपड्यांच्या जागांवर पक्के बांधकाम करून देण्यात आले होते. परंतु म्हाडाने बांधकाम करून दिल्यानंतर याच बांधकामांवर तेथील रहिवाशांनी अनधिकृत मजले चढवले होते. परंतु महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी १४ फुटांवरील सर्व बांधकामे हटवण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिल्यानंतर एच पूर्व विभागाचे तत्कालन सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी या बेहराम पाड्यात शिरुन येथील वाढीव बांधकामे तोडण्याची मोहिम हाती घेतली. परंतु महापालिकेकडून सुरु असलेल्या या कारवाईमुळे नुकसान होऊ नये म्हणून स्वत:च येथील रहिवाशांनी आपली बांधकामे तोडली होती.

New Project 2024 12 18T210530.120

(हेही वाचा – विजय मल्ल्या आणि नीरव मोदीकडून वसूल केले २२ हजार कोटी; Nirmala Sitharaman यांनी संसदेत दिली माहिती)

परंतु आज पुन्हा एकदा बेहराम पाड्यात पाच ते सात मजली बांधकाम करून त्यामध्ये निवासी आणि कमर्शियल वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील टोलेजंग इमारतींमध्ये जर दुघर्टना झाल्यास मोठी मनुष्यहानी होण्याची भीती वर्तवली जात आहे. या मुस्लिमबहुल वस्तीमध्ये कोणताही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत दाखवत नसल्याने येथील अनधिकृत वाढीव बांधकामे (Unauthorized Constructions) मोठ्याप्रमाणात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तर या बेहराम पाड्याच्या समोरील बाजूस रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या गरीब नवाज नगरमध्येही काही वर्षांपूर्वी आगीची दुघर्टना घडल्यानंतर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात आली होती. ही घरे बांधून देताना दोन घरांमध्ये पुरेशी जागा सोडली होती, तसेच पुलाच्या शेजारी भागांमध्ये पुरेशी मोकळी जागा सोडली गेली होती. परंतु येथील एक मजली बांधकामांच्या जागी तीन ते चार मजली झोपड्यांचे बांधकाम होत असताना तसेच येथील रेल्वेच्या या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असतानाही रेल्वे प्रशासनाचे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून या बांधकामांवर कारवाई केली जात नसल्याने या झोपड्यांनी आता रेल्वे पुलाचे चुंबन घेण्यास सुरुवात केले आहे. या झोपड्यांनी पुलाला विळखा घातल्याने पुलावर अंधार पसरलेला आहे. मागील वेळेस येथील झोपड्यांना आग लागल्यामुळे येथील रेल्वेचे पुल नागरिकांसाठी अनेक दिवस बंद ठेवण्यात आले होते तसेच पूर्व दिशेला जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे पुलाला खेटून बांधकाम होऊनही रेल्वे प्रशासनाचे अधिकारी डोळ्यांवर पट्टी लावून बसल्याचे दिसून येत आहे. (Unauthorized Constructions)

New Project 2024 12 18T210622.329

(हेही वाचा – BMC : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांसह अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे दुर्लक्ष; आयुक्तांचे आदेश केवळ कागदावरच)

एवढेच नाही वांद्रे रेल्वे स्थानक ते कलानगरला जाणाऱ्या रस्ते पुलापर्यंतची जागा ही रेल्वेची मालकीची आहे. या मार्गावरील महापालिकेची जलवाहिनी जात असल्याने जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १० मीटर जागा सुरक्षित ठेवून संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीला खेटून रेल्वेच्या जाागांमध्येही झोपड्या वसल्या असून याकडेही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या जमिनीवर झोपडपट्टी वस्ती वसली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Unauthorized Constructions)

New Project 2024 12 18T210421.528

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.