Maharashtra Weather: थंडीचा कडाका कायम; पारा घसरला, ‘या’ भागांत तापमान कमालीचं घसरलं

57
Maharashtra Weather: थंडीचा कडाका कायम; पारा घसरला, 'या' भागांत तापमान कमालीचं घसरलं
Maharashtra Weather: थंडीचा कडाका कायम; पारा घसरला, 'या' भागांत तापमान कमालीचं घसरलं

सध्या महाराष्ट्रासह देशभरात (Maharashtra Weather) थंडीचा (Cold Wave) कडाका प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, उत्तरेकडे येणाऱ्या शीतलहरी आणि पाकिस्तान , अफगाणिस्तानच्या पर्वतरांगेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा थेट प्रभाव भारतातील हवामानावर दिसत आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-Gateway of India boat accident : मुंबई बोट अपघात कसा झाला? CM Devendra Fadnavis म्हणाले …

दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात (Temperature) काहीशी चढउतार संभवते. दरम्यान, विदर्भात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून उत्तर महाराष्ट्रही गारठलाय. जळगावात बुधवारी 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश ठिकाणी 10 अंशांखाली तापमान गेले होते. भारतीय हवामान केंद्राचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी तापमानाचा पारा घसरल्याचे सांगत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान तापमानाच्या नोंदी सांगितल्या आहेत. (Maharashtra Weather)

हेही वाचा-Thane District परिषदेकडून ‘आपले सरकार पोर्टल’वरील ९९ टक्के तक्रारी निकाली

राज्यात काल (१८ डिसेंबर) 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये 8.9 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली. नाशिक, बारामती, उद्गीर, नागपूर जिल्ह्यात 9 अंशांवर तापमान गेलं होतं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली असून धाराशिव 8.6, नांदेड 8.9 अंश सेल्सियसवर होते. महाबळेश्वर शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.