Jammu and Kashmir च्या कुलगाममध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

36
Jammu and Kashmir च्या कुलगाममध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी
Jammu and Kashmir च्या कुलगाममध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम (Kulgam) जिल्ह्यातील कद्दर भागात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत. गुरुवारी (19 डिसेंबर ) सकाळी लष्कर आणि पोलिसांना या भागात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. लष्करानेही प्रत्युत्तर दिले. (Jammu and Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कदेर येथे संशयित दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध आणि नाकाबंदी मोहिम सुरू केली. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी उपस्थित असल्याच्या विशिष्ट माहितीनंतर १९ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी कुलगाममध्ये कादेर येथे संयुक्त मोहिम सुरू करण्यात आली. या भागात संशयित हालचाली दिसून आल्या. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. (Jammu and Kashmir)

डिसेंबरमध्ये चकमकीची पहिली घटना
गेल्या महिन्यात नुकतेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पेशल टास्क फोर्स ऑफ द नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या देशाच्या दहशतवाद विरोधी गटाला जम्मूमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले होते. डिसेंबरमध्ये चकमकीची पहिली घटना आहे. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांत 9 चकमकी झाल्या होत्या. ज्यामध्ये 8 दहशतवादी मारले गेले. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.