Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; ‘असे’ असेल वेळापत्रक

59
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; 'असे' असेल वेळापत्रक
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; 'असे' असेल वेळापत्रक

पुण्यावरून (Pune) कुंभमेळाव्यासाठी (Kumbh Mela 2025) मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळात गर्दी असते. या मेळाव्यात अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. (Kumbh Mela 2025)

मध्य रेल्वे दि. १३.०१.२०२५ ते दि. २६.०२.२०२५ या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पुणे – मऊ आणि नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या चालवणार आहे. (Kumbh Mela 2025)

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मऊ कुंभमेळा विशेष (१४ सेवा)

01033 कुंभमेळा विशेष दि. ०९.०१.२०२५, १७.०१.२०२५, २२.०१.२०२५, २५.०१.२०२५, ०५.०२.२०२५, २२.०२.२०२५ आणि २६.०२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी २२.०० वाजता पोहोचेल. (७ सेवा) ((Kumbh Mela 2025) )

01034 कुंभमेळा विशेष दि. १०.०१.२०२५, १८.०१.२०२५, २३.०१.२०२५, २६.०१.२०२५, ०६.०२.२०२५, २३.०२.२०२५ आणि २७.०२.२०२५ रोजी मऊ येथून २३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (७ सेवा) ((Kumbh Mela 2025) )

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, तलवारिया, चनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चक्की मिर्झापूर, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड. (Kumbh Mela 2025)

संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.(Kumbh Mela 2025)

 

२) पुणे – मऊ कुंभमेळा विशेष (१२ सेवा)

01455 कुंभमेळा विशेष पुणे येथून दि. ०८.०१.२०२५, १६.०१.२०२५, २४.०१.२०२५, ०६.०२.२०२५, ०८.०२.२०२५ आणि २१.०२.२०२५ रोजी सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि २१.०२.२०२५ रोजी मऊ येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. (६ सेवा)

01456 कुंभमेळा विशेष ०९.०१.२०२५, १७.०१.२०२५, २५.०१.२०२५, ०७.०२.२०२५, ०९.०२.२०२५ आणि २२.०२.२०२५ आणि २२.०२.२०२५ रोजी मऊ येथून २३.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता पोहोचेल. (६ सेवा)

थांबे : दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवाडिया छनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, मिर्झापूर, वाराणसी, शहागंज आणि आझमगड.

संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान , ६ सामान्य द्वितीय श्रश्रेणी/चेअर कार, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

 

३) नागपूर – दानापूर कुंभमेळा विशेष (८ सेवा)

01217 कुंभमेळा विशेष २६.०१.२०२५, ०५.०२.२०२५, ०९.०२.२०२५ आणि २३.०२.२०२५ रोजी नागपूर येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

01218 कुंभमेळा विशेष दि. २७.०१.२०२५, ०६.०२.२०२५, १०.०२.२०२५ आणि दि. २४.०२.२०२५ रोजी दानापूर येथून सकाळी १६.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १९.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे : नरखेड, आमला, बैतुल, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण : कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक 01033, 01455 आणि 01217 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २०.१२.२०२४ रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि तिकीट यूटीएसद्वारे बुक केले जाऊ शकतात.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी, कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.