-
ऋजुता लुकतुके
तळाच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे आणि पावसाच्या व्यत्ययामुळे भारताने ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. पण, आधाडीची फळी आणि त्यातही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं अपयश भारतीय ड्रेसिंग रुमला सलणारंच आहे. दोघंही सातत्याने चुकीचे फटके खेळून बाद होत आहेत. त्यामुळे ब्रिस्बेनमध्येही रोहितला फॉर्मविषयाची प्रश्न आवर्जून विचारण्यात आला. त्याने कामगिरी खराब होत असल्याचं मान्य केलं. पण, त्याचबरोबर भविष्याविषयी तो सकारात्मक होता. (Rohit Sharma)
(हेही वाचा- Mohammed Shami : मोहम्मद शमीविषयी रोहितने दिला हा महत्त्वाचा अपडेट)
पहिली पर्थ कसोटी तो खेळला नव्हता. त्यानंतर ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये त्याने अनुक्रमे ३, ६ आणि १० अशा धावा केल्या आहेत. शिवाय ६ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळायला आला आहे. त्यामुळे फॉर्म आणि फलंदाजीचा क्रमांक यावर अनेकांनी त्याला प्रश्न विचारले. (Rohit Sharma)
‘माझ्याकडून धावा झालेल्या नाहीत, हे तर खरंच आहे. ते स्वीकारायलाच हवं. पण, मी कशी तयारी करतोय हे मला माहीत आहे. मी प्रयत्नांत कसलीही कसूर सोडलेली नाही. त्यामुळे कधी ना कधी सगळं सुरळीत होणार आहे. खेळपट्टीवर पुरेसा वेळ धालवला की, सगळं ठिक होईल,’ असं रोहित म्हणाला. पुढे रोहित म्हणतो, ‘जोपर्यंत माझं शरीर,मन आणि पाय मला साथ देत आहेत, तोपर्यंत मला कशाची काळजी वाटत नाही. मोठी धावसंख्या होत नाही तोपर्यंत माझा फॉर्म नाही, असंच सगळे म्हणणार. पण, मला माझ्या आत काय सुरू आहे ते समजतंय. मी आतून शांत आणि तंदुरुस्त आहे.’ (Rohit Sharma)
(हेही वाचा- राजकीय पक्ष आमच्या आदेशाचा आदर करत नाहीत; बेकायदा होर्डिंग्जविषयी Bombay High Court ची नाराजी)
बोर्डर – गावसकर मालिकेत आता १ – १ अशी बरोबरी आहे. चौथी कसोटी २६ डिसेंबरला मेलबर्न इथं सुरू होणार आहे. या कसोटीतही रोहित मधल्या फळीतच खेळायला येईल, असं दिसत आहे. कारण सलामीवीर म्हणून के. एल. राहुलने आपला जम बसवला आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community