विधान परिषदेच्या सभापतीपदी Ram Shinde; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्राध्यापक राम शिंदे हे…”

51
विधान परिषदेच्या सभापतीपदी Ram Shinde; देवेंद्र फडणवीस म्हणाले,
विधान परिषदेच्या सभापतीपदी Ram Shinde; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्राध्यापक राम शिंदे हे..."

महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विधानपरिषद (Legislative Council) सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मागील दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. सध्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापतीपदावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राम शिंदे (Ram Shinde) यांनी काल (18 डिसेंबर) विधानपरिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. आज विधान परिषदेच्या सभापतीपदाची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा- Kumbh Mela 2024 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; ‘असे’ असेल वेळापत्रक

विधान परिषदेचे सभापतीपदी राम शिंदे (Ram Shinde) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे (Ram Shinde) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.

हेही वाचा-Jammu and Kashmir च्या कुलगाममध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो. आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींची निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचेदेखील आभार मानतो.” (Ram Shinde)

हेही वाचा-Maharashtra Weather: थंडीचा कडाका कायम; पारा घसरला, ‘या’ भागांत तापमान कमालीचं घसरलं

“प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. यापूर्वी देखील ना. स फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला. मला विश्वास आहे की आपणही तसंच अतिशय शिस्तीने पण संवेदनशीलतेने सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही.” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले . (Ram Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.