गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला (Gateway of India boat accident) दुपारी तीनच्या सुमारास धडक बसली आणि या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये तीन जण नौदलाचे कर्मचारी तर दहा जण पर्यटक आहेत. निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. दरम्यान, या अपघातातील काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शोधकार्य सुरू असल्याची माहिती आहे. (Gateway of India boat accident)
नेव्ही चालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, कुलाबा येथे निलकमल बोटला काल नेव्हीच्या बोटने धडक दिली. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणं बेपत्ता आहेत. नेव्हीच्या चालकावर आम्ही भरधाव वेगाने बोट चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. 13 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटलेली आहे. मुंबई पोलिस कोस्टल पेट्रोलिंग आणि इतर यंत्रणेच्या मदतीने शोध मोहिम अजूनही सुरू आहे. अद्याप दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. हसंराज सतराजी भाटी (43 वर्ष), जोहान निसार अहमद (6 वर्ष) हे दोघे अद्याप बेपत्ता आहेत. (Gateway of India boat accident)
4 नेव्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कुलाबा अपघात प्रकरणी 9 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या अपघातात तीन परदेशी नागरिक ही होते. दोन जर्मनी आणि एक कॅनडाचा नागरिक होता. नेव्हीच्या बोटवरील 6 जणं होती. यातील 4 नेव्हीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. दोन नेव्हीच्या अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. नेव्हीची बोट त्या ठिकाणी ट्रायल ड्राइव्ह घेत असताना हा अपघात झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Gateway of India boat accident)
घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार
नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला. दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे.” (Gateway of India boat accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community