Ashwin Retires : अश्विनच्या अचानक निवृत्तीमागे गौतम गंभीरचा हात किती?

Ashwin Retires : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर अश्विनने तात्काळ निवृत्तीची घोषणा केली.

44
Ashwin Retires : अश्विनच्या अचानक निवृत्तीमागे गौतम गंभीरचा हात किती?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेतील ब्रिस्बेन कसोटीत भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण नेहमीपेक्षा वेगळं होतं. पहिल्या डावात आघाडीच्या फळीने निराशा केल्यामुळे तिसऱ्या दिवसापासून फॉलो ऑन कसा वाचवायचा आणि पर्यायाने कसोटी अनिर्णित कशी राखायची हा चर्चेचा मुख्य विषय होता. राहुल आणि जडेजा यांचं अर्धशतक आणि बुमराह, आकाशदीपने शेवटच्या गड्यासाठी केलेल्या ४७ धावांच्या भागिदारीमुळे कसोटी वाचवण्याची संधी निर्माण झाली होती. अर्थातच, हे दोन दिवस चर्चा फक्त कसोटीची होती आणि अशा वातावरणात संघातल्याच एका व्यक्तीच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. ही व्यक्ती ड्रेसिंग रुममधील आपले शेवटचे क्षण घालवत होती. (Ashwin Retires)

कसोटी अनिर्णित राहिली आणि अचानक या व्यक्तीने एक निर्णय तडकाफडकी जाहीर करून टाकला. ‘आजचा दिवस भारतीय ड्रेसिंग रुममधील माझा शेवटचा दिवस आहे!’ ड्रेसिंग रुममधील चर्चेचा विषय एकदम बदलला. क्रिकेटची चर्चा या माणसाचं योगदान, संघासाठी त्याने बजावलेली कामगिरी या विषयांकडे वळली. रवीचंद्रन अश्विन असं या व्यक्तीचं नाव. आणि १३ वर्षांत ७६७ आंतरराष्ट्रीय बळी घेऊन त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम म्हटलं होतं. (Ashwin Retires)

(हेही वाचा – Gateway of India boat accident प्रकरणातील दोन जण अद्याप बेपत्ता)

नंतर तो पत्रकार परिषदेत रोहीतबरोबर गेला. तिथे त्याने अधिकृतपणे आपला निर्णय लोकांसमोर सांगितला. पण, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. नंतर असं उघड झालं की, संघातील ज्येष्ठ खेळाडू रोहित आणि विराटलाही या निर्णयाविषयी ठोस माहिती नव्हती. त्यात दोघांनी परस्परविरोधी विधानं केल्यामुळे गूढ आणखी वाढलं आणि एक नवीन प्रश्न समोर आला, अश्विनच्या निवृत्तीत नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भूमिका काय? (Ashwin Retires)

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर अश्विनच्या मनात निवृत्तीचे विचार घोळत होते आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याने निवड समितीच्या सदस्यांशीही चर्चा केली होती. जर अंतिम अकरामध्ये जागा मिळणार असेल तरंच ऑस्ट्रेलियात जायचं या मतावर अश्विन पोहोचला होता, असं पीटीआयने म्हटलं आहे. (Ashwin Retires)

(हेही वाचा – सीमेवरील शांततेसाठी Ajit Doval यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट)

ऑस्ट्रेलियात स्वत:ला शेवटची संधी द्यायची असा अश्विनचा विचार होता. तिथल्या वातावरणात एकाच फिरकीपटूला संधी मिळू शकणार होती. किंवा एक फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून जाडेजा एवढाच पर्याय भारतासमोर होता. रोहित पर्थ कसोटीत खेळला नाही. तेव्हा गंभीरने पत्रकार परिषदेत बोलताना, ‘३ फिरकीपटूंपैकी सर्वोत्तम एका फिरकीपटूला संघात स्थान मिळेल,’ असं सांगतिलं होतं. (Ashwin Retires)

पण, संघ जाहीर झाला तेव्हा अंतिम अकरांमध्ये ना अश्विन होता, ना जाडेजा. त्यामुळे फिरकीपटूंमध्ये पहिला पर्याय आपण नाही, हा संदेश अश्विनपर्यंत पोहोचला होता. तेव्हाच त्याने रोहित शर्माशी या विषयी चर्चा केल्याचं समजतंय आणि रोहितने त्याला ॲडलेड कसोटीत खेळण्याची हमी दिली असावी. यापूर्वीही ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी अंतिम अकरामध्ये खेळण्याच्या हमीवरच अश्विनने ऑस्ट्रेलियात जाण्याचा निर्णय घेतला होता. (Ashwin Retires)

(हेही वाचा – Ashwin Retires : अश्विनची वेळ चुकली असं गावसकरांना का वाटतं?)

ॲडलेडमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण, अश्विनची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. पुढील ब्रिस्बेन कसोटीत तो पुन्हा संघाबाहेर पाहिला. शेवटच्या सिडनी कसोटीत खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असू शकेल. पण, तेव्हाही २ फिरकीपटू निवडले तरी यातील एक आपण असू याची खात्री नाही, हे अश्विनला कळून चुकलं आणि संघाच्या नवीन बांधणीत आपलं स्थान काय आहे हे पाहून अश्विनने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं आता दिसत आहे. एकदा त्याने हा निर्णय घेतल्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मानेही त्याला थांबवलं नाही आणि विराटनेही यात वेगळी भूमिका घेतलेली दिसत नाही. (Ashwin Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.