Virat Kohli : विराट कोहलीची मेलबर्न विमानतळावर पत्रकारांशी बाचाबाची, कुटुंबीयांचं चित्रण करण्यावरून संताप

Virat Kohli : मेलबर्न कसोटीसाठी भारतीय संघाबरोबर विराट मेलबर्नला पोहचला. 

59
Virat Kohli : विराट कोहलीची मेलबर्न विमानतळावर पत्रकारांशी बाचाबाची, कुटुंबीयांचं चित्रण करण्यावरून संताप
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ गुरुवारी ब्रिस्बेनहून मेलबर्नला पोहोचला आहे. खेळाडूंबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफही होता आणि मेलबर्नमध्ये पोहोचल्या पोहोचल्या स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) पत्रकारांबरोबर बाचाबाची झाल्याची बातमी आहे. विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्का आणि वामिका, अकाय ही दोन मुलंही आहेत आणि मुलांचे फोटो तसंच व्हिडिओ काढण्यावरून विराट मीडियावर चिडला.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्यावर भाजपा आमदारांना धक्काबुक्की करण्याचा आरोप; भाजपा आक्रमक)

काही टीव्ही पत्रकारांबरोबर त्याचं भांडण झालं. सुरुवातीला विराट (Virat Kohli) पत्रकारांना काही बोलून तिथून निघूनही गेला. पण, तो काही सेकंदातच मागे फिरला आणि त्याने पुन्हा एकदा पत्रकारांशी वाद घातला. आपल्या कुटुंबीयांचे फोटो पत्रकारांनी काढले नाहीत ना, याकडे विराटचं लक्ष होतं. मालिका १-१ अशी बरोबरीत असताना खुद्द विराटची कामगिरी चांगली होत नाहीए. पर्थ कसोटीत दुसऱ्या डावातील शतक सोडलं तर उर्वरित ४ डावांमध्ये मिळून विराटने (Virat Kohli) फक्त २६ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – Ashwin Retires : अश्विनने निवृत्तीचा निर्णय नेमका कधी घेतला?)

विराटने (Virat Kohli) सध्या फलंदाजीच्या सरावावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण, त्याच्या धावा होत नाहीत. कर्णधार रोहित शर्माचाही फॉर्म हरवला आहे आणि मीडियाशी बोलताना रोहितने ही गोष्ट मान्यही केली. ब्रिस्बेन कसोटीनंतर बोलताना तो म्हणाला की, ‘माझा फॉर्म सध्या खराब आहे, हे मला कबूल करावेच लागेल. पण, माझ्या डोक्यात काय सुरू आहे आणि मी कसा सराव करतोय, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे फॉर्मची चिंता करण्याचं कारण नाही. मी चांगली तयारी करतोय आणि खेळपट्टीवर जास्त वेळ घालवला तर धावही शक्य होतील,’ असं रोहित (Virat Kohli) म्हणाला. एकूणच या मालिकेत आतापर्यंत पर्थचा अपवाद सोडला तर भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली आहे. मेलबर्न कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.