Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम

66
Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम
Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील (Mumbai North West Lok Sabha constituency) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान देणारी उबाठाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उबाठा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची खासदारकी कायम राहणार आहे.

( हेही वाचा : Gateway of India boat accident प्रकरणातील दोन जण अद्याप बेपत्ता

दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम (Mumbai North West Lok Sabha constituency) मतदारसंघात खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा पक्षाचे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी रवींद्र वायकर यांच्याविरोधात खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत फेरफार करून वायकरांना विजयी घोषित करण्यात आले, असा आरोप किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी केला होता. त्यावर न्यायमूर्ती संदीप मारणे (Sandeep Marne) यांच्या एकसदस्यी खंडपीठाने सुनावणी पूर्ण करून ११ डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. मात्र आता वायकर यांच्या विरोधातील किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

वायकर (Ravindra Waikar) यांनी लोकसभा निवडणुकीत केवळ ४८ मतांनी विजय मिळवला. त्यामुळे किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पारदर्शकतेचा अभाव आणि मतमोजणीत त्रुटी असल्याचा आरोप केला. त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली नसल्याचा दावा केला होता. मात्र आता किर्तीकरांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून वायकरांना दिलासा दिलेला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.